Video : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत बुरख्यातील महिलेचा डान्स, उत्साहात नाचताना पाहून नेटिझन्स म्हणाले ‘हाच खरा भारत’
- Published by:Devika Shinde
Last Updated:
नुकताच गणेशोत्सव संपला आणि गणपती बाप्पा आपल्या गावाला गेले. याच मिरवणूकीतला एक अनेखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मुंबई : भारतातील सण-उत्सवांची एक खासियत म्हणजे इथे सर्व धर्म, जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात. मग तो कोणताही सण असोत. गणेशोत्सव हा देखील तसाच सण आहे, जो फक्त एका समाजापुरता मर्यादित नाही तर प्रत्येकाला जोडणारा आहे. नुकताच गणेशोत्सव संपला आणि गणपती बाप्पा आपल्या गावाला गेले. याच मिरवणूकीतला एक अनेखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम महिला बुरखा घालून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झालेली दिसते. ती भक्तांसोबत ताल धरून नाचताना दिसते. तिचा उत्साह पाहून अनेकांनी त्याला धर्मनिरपेक्षतेचं उत्तम उदाहरण म्हटलं आहे. काहींनी लिहिलं की, “हेच आहे आपलं भारत, जिथे सण आनंदाने एकत्र साजरे होतात.” मात्र, या व्हिडिओमुळे काही वादही निर्माण झाले आहेत.
advertisement
सोशल मीडियावरच्या काही लोकांनी या महिलेवर टीका केली. तिच्याच समुदायातील काही जणांनी तिला टार्टेट केल्याची ही चर्चा आहे. हे पाहून अनेकांनी प्रश्न विचारला की, महिलांवर असा दुहेरी मापदंड का लादले जातात? एखादी महिला दुसऱ्या धर्माचा सण आनंदाने साजरा करत असेल तर त्यात गैर काय?
व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची मोठी प्रतिमा विसर्जनासाठी नेण्यात येत आहे आणि त्या उत्सवात ही महिला बिंधास्त थिरकत आहे. ती नाचत असताना तिचा चेहरा पूर्णपणे झाकला गेला आहे. त्यामुळे तिने तिच्या धर्माचं उल्लंघन न करता आपल्या मनातील इच्छा पूर्ण केली आणि मनसोक्त असा डान्स तिने केला.
advertisement
This Muslim woman was happily dancing during Ganpati immersion, but now her own community is targeting her and abusing her.
Why are women so oppressed in Islam?
Just seeing all this makes me feel suffocated.
I am proud to be a Sanatani.😇🚩 https://t.co/X3OuhTXXUm pic.twitter.com/pDZGHzg6vq
— Samyukta Jain (@Drpooookie) September 8, 2025
advertisement
यासोबतच एका महिलेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही महिला बिना बुरख्याची दिसत आहे आणि ती म्हणते की, "मला डान्स आवडतो मग मी नाचणार, मला कोणीच थांबवू शकत नाही. " ही महिला तिच नाचणारी बुरखावाली महिला असल्याचं सांगितलं जात आहे. पण ही महिला तिच आहे का? की दोन वेगवेगळे व्हिडीओ इथे जोडले गेले आहेत का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 4:41 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत बुरख्यातील महिलेचा डान्स, उत्साहात नाचताना पाहून नेटिझन्स म्हणाले ‘हाच खरा भारत’