Horoscope Today: दिवस वाईट होते! या 5 राशीचे लोक आता चौफेर प्रगती साधणार; वक्री शनी शुभफळदायी
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 06, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
मेष (Aries) - आज शनिवारी तुम्हाला नाविन्यपूर्ण कल्पना सुचू शकतात. तुमच्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा आणि धाडसी पावलं उचला. आपल्या प्रियजनांचं कौतुक करा आणि पाठिंबा द्या. तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले नातेसंबंध जोपासा. त्यातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळू शकते. तुमच्या मूल्यांशी जुळणाऱ्या आर्थिक संधी शोधा. आज चौकटी बाहेरील विचार करा आणि वेगळे मार्ग ढुंडाळा. मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्रोत्साहन देणार्या गोष्टी करा.
LUCKY Color - Electric Blue
LUCKY Number - 15
LUCKY Color - Electric Blue
LUCKY Number - 15
advertisement
वृषभ (Taurus) - आज शनिवारी तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. तुमची सर्जनशील क्षमता वापरा. तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळू शकतो. त्यामुळे जबाबदारी घ्या आणि इतरांना प्रेरणा द्या. आर्थिक लाभ दृष्टिपथात आहे. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करा आणि दृढनिश्चयाने त्यांचा पाठपुरावा करा. तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या फिजिकल अॅक्टिव्हिटींमध्ये व्यग्र रहा.
LUCKY Color - Gold
LUCKY Number - 11
LUCKY Color - Gold
LUCKY Number - 11
advertisement
मिथुन (Gemini) - आज आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा. तुमची सर्जनशीलता आज कामात महत्त्वाची ठरू शकते. आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रती सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवा. तुमचा पाठिंबा तुमचे बंध दृढ करू शकतो. फिरायला जाण्याची गरज आहे, तिथे तुम्हाला हवी असलेली शांतता मिळू शकते. आर्थिक लाभ दृष्टीपथात आहे. जेव्हा आर्थिक निर्णय घेण्याची वेळ येईल येतो तेव्हा अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा. विश्रांतीला प्राधान्य द्या. त्यात तुमचं हित आहे.
LUCKY Color - Sea Green
LUCKY Number - 20
LUCKY Color - Sea Green
LUCKY Number - 20
advertisement
कर्क (Cancer) - आज कामे होतील, पण साध्य करता येतील अशी उद्दिष्टे समोर ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी स्थिरपणे कार्य करा. चिकाटीने घेतलेले कष्ट आणि समर्पणाचं आज कौतुक होऊ शकतं. सेवा आणि समर्थनाच्या कृतींद्वारे तुमचे कौटुंबिक बंध दृढ करा. तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होऊ शकते. विश्रांती मिळेल अशा ठिकाणी सहलीला जाण्याची योजना आखा. यामुळे चांगला बॅलन्स मिळेल. आर्थिक स्थैर्य दृष्टीपथात आहेत. आर्थिक नियोजनात शिस्त ठेवा. स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या आणि निरोगी दिनचर्या ठेवा.
LUCKY Color - Gray
LUCKY Number - 10
LUCKY Color - Gray
LUCKY Number - 10
advertisement
सिंह (Leo) - आज कामात तुमची क्षितिजं विस्तृत करणारे नवीन अनुभव येतील. तुमचा आशावाद आणि उत्साह तुमच्या सभोवतालच्या लोकांना प्रेरणा देईल. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. आज कामातून एक नवीन दृष्टीकोन मिळू शकतो आणि तुम्हाला नवचैतन्य मिळू शकतं. आर्थिक निर्णय घेताना अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा. आर्थिक वाढीच्या संधी दृष्टीपथात आहेत. मनाला उभारी मिळेल अशा फिजिकल अॅक्टिव्हींमध्ये गुंतून राहा.
LUCKY Color - Purple
LUCKY Number - 24
LUCKY Color - Purple
LUCKY Number - 24
advertisement
कन्या (Virgo) - आज डोक्यात विविध विचार येतील. सर्व गोष्टींचा खोलवर विचार करा काही बदल स्वीकारा. तुमचा दृढनिश्चय आणि एकाग्रतेमुळे कामातील आव्हानांवर मात करता येईल. आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. जवळच्या व्यक्तींना दयाळूपणा दाखवून बंध दृढ करा. दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रीत केल्यास आर्थिक लाभ दृष्टीपथात आहे. भावनिक आरोग्याला प्राधान्य द्या आणि स्वत:ची काळजी घ्या. त्याने बरं वाटेल.
LUCKY Color - Maroon
LUCKY Number - 8
LUCKY Color - Maroon
LUCKY Number - 8
advertisement
तूळ (Libra) - आज शनिवारी स्वतःतील संतुलन आणि सुसंवाद शोधण्यावर लक्ष केंद्रीत करा. मनाला शांती देणार्या गोष्टींमध्ये गुंतून राहा. तुमच्यातील मुत्सद्दीपणाचा गुण ऑफिसमधील संघर्ष सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सर्वांचा फायदा होईल असे उपाय शोधा. समजूतदारपणा आणि तडजोडीच्या माध्यमातून तुमचे कौटुंबिक बंध दृढ करा. यातून तुमच्या मनाला नवचैतन्य मिळू शकतं. मोठे निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्ला घ्या. सहकार्यामुळे आर्थिक भरभराट होऊ शकते.
LUCKY Color - Pastel Pink
LUCKY Number - 17
LUCKY Color - Pastel Pink
LUCKY Number - 17
advertisement
वृश्चिक (Scorpio) - आज आनंद मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. ऑफिसमध्ये स्वप्नरंजनामध्ये न रमता, ऑर्गनाइज्ड आणि प्रॉडक्टिव्ह राहा. कामात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. शनिवारी थोडा आराम केल्यास तुम्हाला उर्जा आणि नवीन दृष्टीकोन मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थिरता दृष्टीपथात आहे. चांगल्या परताव्यासाठी दीर्घकालीन उपक्रमांमध्ये गुंतवणूक करा. स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या आणि संतुलित जीवनशैली राखा.
LUCKY Color - Green
LUCKY Number - 26
LUCKY Color - Green
LUCKY Number - 26
advertisement
धनू (Sagittarius) - आज काही नवीन ज्ञान आत्मसात करा त्याचा फायदा होईव. तुम्हाला आव्हानात्मक वाटणाऱ्या बौद्धिक कामात व्यग्र रहा. आज तुमच्या संवादकौशल्याचा वापर होऊ शकतो. आर्थिक सल्ला घ्या आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी शोधा. धनू राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक प्रगती आवाक्यात आहे. क्लॅरिटी आणि एकाग्रतेसाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी करा.
LUCKY Color - Yellow
LUCKY Number - 35
LUCKY Color - Yellow
LUCKY Number - 35
advertisement
मकर (Capricorn) - शनिवार चांगला आहे. आज आत्म-चिंतन आणि आपल्या आवडीनिवडींवर वेळ द्या. वैयक्तिक प्रगतीसाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कष्टाचं कौतुक होऊ शकतं त्यामुळे वाटचाल सुरू ठेवा. कृतज्ञता, प्रेम आणि काळजी व्यक्त करून कौटुंबिक बंध दृढ करा. एका दिवसाच्या सहलीने तुम्हाला नवचैतन्य मिळेल. आर्थिक संधींसाठी तयार राहा आणि मागील चुका टाळा. चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी फिजिकल अॅक्टिव्हिटींमध्ये व्यग्र रहा. कामांमध्ये मन गुंतल्याने समाधान मिळेल.
LUCKY Color - Red
LUCKY Number - 49
LUCKY Color - Red
LUCKY Number - 49
advertisement
कुंभ (Aquarius) - आजचा शनिवारचा दिवस चांगला आहे, स्वत:ची काळजी घ्या. वैयक्तिक प्रगतीसाठी तुमच्या अंतर्मनाची काळजी घ्या. आज महत्त्वाचे निर्णय घेताना तुमची अंत:प्रेरणा तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. तुमच्या प्रियजनांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. सहानुभूती दाखवा आणि त्यांचं म्हणणं ऐकूण घ्या. निसर्गाशी कनेक्ट होता येईल अशा ठिकाणी सहलीला गेल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. आज आर्थिक निर्णय घेताना सावध राहा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या. विश्रांती आणि इमोशनल वेलबिईंगला प्राधान्य द्या. त्यामुळे आनंद व समाधान मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल.
LUCKY Color - Silver
LUCKY Number - 72
LUCKY Color - Silver
LUCKY Number - 72
advertisement
मीन (Pisces) - आज तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. तुमच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळू शकतो. प्रियजनांना प्रेमानं वागणूक द्या. नातेसंबंधांमध्ये आनंद आणि सुसंवाद निर्माण करा. सगळ्यांना बरोबर घ्या. तुमची आवड आणि उर्जा वाढवणाऱ्या ठिकाणी सहलीला जा. आर्थिक लाभ दृष्टीपथात आहेत. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करा आणि दृढनिश्चयाने त्यांचा पाठपुरावा करा.
LUCKY Color - Gold
LUCKY Number - 11
LUCKY Color - Gold
LUCKY Number - 11