Numerology: पटत नाही भांडत बसतात! या 2 जन्मतारखा असलेल्यांचा प्रॉब्लेम म्हणजे स्थिरता VS परिवर्तन

Last Updated:
Numerology: अंकशास्त्रानुसार प्रत्येक जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव निरनिराळा असतो. जन्मतारखेवरून आपला मूलांक ठरवला जातो. कोणत्या मूलांकाचा कोणत्या मूलांकांशी संबंध कसा राहील याविषयी जाणून घेता येते. वैवाहिक जीवन असो की व्यावसायिक पार्टनर, तुम्हाला त्याचा मूलांक समजल्यास अनेक गोष्टी जाणून घेता येतात. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचे विविध गुणधर्म असतात दोन भिन्न मूलांक एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यातील ऊर्जा परस्परपूरक किंवा विरोधाभासी असू शकते. आज आपण मूलांक ४ आणि ५ यांच्यातील नातेसंबंध जाणून घेऊ. 
1/6
४ मूलांकाचे लोक शिस्तबद्ध, मेहनती, स्थिर, व्यवहारिक आणि पद्धतशीर असतात. ते नियम आणि सुरक्षिततेला महत्त्व देतात. त्यांचा स्वभाव काहीसा हट्टी आणि परंपरागत असतो. तर ५ मूलांकाचे लोक बुद्धिमान, स्वतंत्र, परिवर्तनशील, साहसी आणि बोलके असतात. त्यांना स्वातंत्र्य आणि नवीनता आवडते. ते एकाच ठिकाणी जास्त काळ थांबू शकत नाहीत.

advertisement
2/6
या दोन मूलांकाच्या लोकांमध्ये काही समानता, पण बरेच विरोधाभास दिसून येतात. या दोघांमधील चांगल्या गोष्टी म्हणजे दोन्ही मूलांक खूप बुद्धिमान आणि तार्किक असतात. त्यामुळे ते एकमेकांच्या विचारांकडे आकर्षित होतात. त्यांच्यात बौद्धिक चर्चा आणि विचार-विनिमय चांगला होऊ शकतो.

3/6
दोघेही काही प्रमाणात व्यावहारिक असल्याने, ते अनेकदा महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत होऊ शकतात. विशेषतः आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत ते चांगले काम करतात. मूलांक ४ मेहनती आणि मूलांक ५ साहसी असल्यामुळे, जेव्हा ते एकत्र येतात, तेव्हा कोणत्याही कामात चांगले यश मिळवतात.

4/6
स्थिरता विरुद्ध परिवर्तन हा दोन मूलांकामधील सर्वात मोठा विरोधाभास असतो. कारण मूलांक ४ ला स्थिरता आणि सुरक्षितता हवी असते, तर मूलांक ५ ला सतत बदल आणि रोमांचक नवीन काहीतरी हवं असतं. मूलांक ४ चे पद्धतशीर जीवन मूलांक ५ ला कंटाळवाणे वाटू शकते, तर मूलांक ५ ची अस्थिरता आणि धोका घेण्याची वृत्ती मूलांक ४ साठी असुरक्षितता निर्माण करू शकते.

5/6
मूलांक ४ नियमांचे पालन करणारा असतो, तर मूलांक ५ ला कोणतेही बंधन आवडत नाही. त्यामुळे, मूलांक ४ ने लादलेले नियम किंवा बंधन मूलांक ५ सहज धुडकावून लावू शकतो, त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ शकतात. मूलांक ५ ला सामाजिक जीवन आणि प्रवास आवडतो, तर मूलांक ४ चे लोक सहसा घरात राहणे पसंत असतं. त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत हा फरक नेहमीच जाणवतो.

6/6
समतोल साधण्यासाठी - मूलांक ४ ने मूलांक ५ च्या स्वातंत्र्याचा आदर करावा आणि मूलांक ५ ने मूलांक ४ च्या सुरक्षिततेची गरज समजून घ्यावी.  मूलांक ४ ने आयुष्यात नवीनता आणण्यासाठी मूलांक ५ च्या कल्पना स्वीकारायला हव्यात. मूलांक ४ च्या नियोजित स्वभावाचा फायदा घेऊन मूलांक ५ ने काही जबाबदाऱ्या स्वीकारल्यास नात्यात स्थिरता येईल. एकमेकांशी संवाद साधताना स्पष्ट आणि शांतपणे बोलावे, जेणेकरून गैरसमज होणार नाहीत. 
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement