Tata ला ओपन चॅलेंज, Maruti ची नवी कोरी SUV निघाली टँकसारखी मजबूत, मिळाले 5 स्टार रेटिंग
- Published by:Sachin S
Last Updated:
अलीकडेच लाँच केलेली maruti suzuki victoris ला आता ग्लोबल एनसीएपी Global NCAP (New Car Assessment Program) मध्ये क्रॅश टेस्टमध्येही ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. मारुती सुझुकीची ही दुसरी कार ही ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी ठरली आहे.
भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आणखी एक धमाका केला आहे. अलीकडेच लाँच केलेली maruti suzuki victoris ला आता ग्लोबल एनसीएपी Global NCAP (New Car Assessment Program) मध्ये क्रॅश टेस्टमध्येही ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. मारुती सुझुकीची ही दुसरी कार ही ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी ठरली आहे. या maruti suzuki victoris प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. जीएनसीएपीच्या नवीन प्रोटोकॉलनुसार या मॉडेलची चाचणी घेण्यात आली. व्हिक्टोरिसमध्ये मानक 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि पादचाऱ्यांची सुरक्षा समावेश आहे, तर ADAS (ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम) पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
advertisement
advertisement
एसयूव्हीने ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या गुडघ्यांना तसेच ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला आणि प्रवाशांना चांगलं संरक्षण दिलं. एसयूव्हीमध्ये ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला पुरेसं संरक्षण मिळालं. बॉडीशेल आणि फूटवेल क्षेत्राला जास्त भार सहन करण्यास सक्षम म्हणून रेट केलं गेलं. साइड इम्पॅक्ट सेफ्टी साइड इम्पॅक्टमध्ये, व्हिक्टोरिसने छातीला पुरेसे संरक्षण आणि डोके, पोट आणि पेल्व्हिसला चांगले संरक्षण दिले.
advertisement
साइड पोल इम्पॅक्टमध्ये सुद्धा डोके, छाती, पोट आणि पेल्व्हिसची सुरक्षा देखील चांगली रेटिंग देण्यात आली. सर्व सीटिंग पोझिशन्ससाठी सीट बेल्ट रिमाइंडर्स (SBRs) जागतिक NCAP मानकांची पूर्तता करतात. SUV ची पादचाऱ्यांची सुरक्षा देखील UN127 नियमांचे पालन करते. 49 पैकी 41 गुण मारुती व्हिक्टोरिस चाइल्ड सेफ्टी मुलांच्या सुरक्षेमध्ये, मारुती व्हिक्टोरिसने 49 पैकी 41 गुण मिळवले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement