MINI: फॉर्च्युनरपेक्षा दमदार आणि सुपरफास्ट, भारतात लाँच झाली MINI ची पॉवरफुल SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
मिनी कंट्रीमैन JCW भारताच्या सर्वात प्रीमियम (premium) कार्सपैकी एक बनली आहे.
भारतात टेस्लाने पाऊल टाकल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय कार उत्पादक कंपन्यांची भाऊगर्दी झाली आहे. एकापाठोपाठ एक दमदार आणि पॉवरफुल कार आणि एसयूव्ही लाँच करण्याचा धडाका लावला आहे. अशातच आता मिनी कंट्रीमँन JCW (MINI Countryman JCW) अखेरीस भारतात लॉन्च झाली आहे. ही एसयूव्ही पावर्ड व्हर्जन CBU (Completely Built Up) द्वारे भारतात आली आहे. मागील वर्षी लॉन्च झालेल्या कंट्रीमँन इलेक्ट्रिक (Countryman Electric) सोबत या एसयूव्हीची विक्री केली जाईल. नव्याने लॉन्च झालेल्या MINI Countryman JCW साठी बुकिंग 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
MINI Countryman JCW चा लूक स्पोर्टी आहे, ज्यात ब्लॅक्ड-आऊट ग्रिल, रिडिझाईन्ड फ्रंट बम्पर, 19-इंच फाइव्ह-स्पोक ॲलॉय व्हील्स , रिअरमध्ये ब्लॅक्ड-आऊट ‘कंट्रीमैन’ लेटरिंग, रूफ स्पॉयलर आणि क्वाड-एग्जॉस्ट (quad-exhaust) आहेत. बंपर्स, रूफ , ब्रेक कॅलिपर्स, ORVMs वर रेड हायलाइट्स आणि C-पिलर आणि रिअर वर JCW बॅजिंग दिलं आहे जे स्पोर्टी अपीअरन्सला आणखी वाढवतो.
advertisement
MINI Countryman JCW मध्ये ३ कलर ऑप्शन्स दिले आहे – मिडनाइट ब्लॅक (Midnight Black), लीजेंड ग्रे (Legend Grey) आणि रेसिंग ग्रीन (Racing Green). ग्राहक रूफ आणि ORVMs वर रेड (Red) किंवा ब्लॅक (Black) हायलाइट्स मधून निवड करू शकतात. मिनी कंट्रीमैन JCW भारताच्या सर्वात प्रीमियम (premium) कार्सपैकी एक बनली आहे. या एसयूव्हीची किंमत 64.9 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे.