Tata ला थेट भिडणार, लाँच झाली Renault ची Kwid EV, रेंज आणि लूक पाहून पडाल प्रेमात
- Published by:Sachin S
Last Updated:
सर्वच कार उत्पादक कंपन्या ईलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा धडका लावला आहे. अशातच आता फ्रेंच कार उत्पादक कंपनी Renault ने आपली पहिली ईलेक्ट्रिक कार लाँच केली आहे.
भारतात सध्या ईलेक्ट्रिक वाहनांची लाट आली आहे. सर्वच कार उत्पादक कंपन्या ईलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा धडका लावला आहे. अशातच आता फ्रेंच कार उत्पादक कंपनी Renault ने आपली पहिली ईलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. मुळात कंपनीने ही कार ब्राझिलमध्ये लाँच केली आहे. पण लवकरच ही भारतात सुद्धा पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
Renault Kwid E-Tech 2025 असं या कारचं नाव आहे. मुळात ही कार Dacia Spring EV चं रीबॅज्ड (rebadged) व्हर्जन आहे, जे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये Citroen eC3 आणि इतर लहान इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करतं. अपडेटेड Kwid EV मध्ये फिचर्स आणि डिझाईनमध्ये बदल केले आहे.
advertisement
Renault Kwid E-Tech 2025 च्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर, नवीन Kwid EV ला पूर्णपणे नवीन फ्रंट आणि अधिक शार्प पोझिशन दिलं आहे. यामध्ये क्लोज्ड ग्रिल, वर्टिकल स्लॅट्स, नवे प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, नवे बंपर्स आणि बोनेटचा समावेश आहे.
advertisement
यात नवे Y-आकाराचे LED टेललॅम्प्स देखील आहेत. 14-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, ब्लॅक व्हील आर्च क्लॅडिंग, विंग मिरर माउंटेड इंडिकेटर्स, दरवाज्यांवर बॉडी-साईड मोल्डिंग आणि रिव्हर्स लॅम्प्स यांसारखे डिझाइन दिले आहे. जे आधीच्या मॉडेलमध्ये आहे.
advertisement
इंटिरियर कसं आहे? - 2025 Renault Kwid EV इंटिरियरमध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲप्पल कारप्ले, नव्या ग्राफिक्ससह 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, २ USB-C पोर्ट्स आणि नवीन Duster सारख्या स्टीअरिंग व्हील दिलं आहे.
advertisement
सेफ्टी फिचर्स - Renault Kwid E-Tech 2025 मध्ये स्टँडर्ड सेफ्टी किट दिली आहे. आता या गाडीत 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, Isofix माउंट्स, रियर कॅमेरा, हिल स्टार्ट असिस्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडर्स यांचा समावेश आहे.
advertisement
विशेष म्हणजे, नवीन Renault Kwid EV निवडक बाजारपेठांमध्ये ADAS सह देखील सादर केली जाईल. ADAS सूटमध्ये लेन कीपिंग असिस्ट, इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, क्रूझ कंट्रोलसह अनेक फीचर्सचा समावेश आहे.
advertisement
रेंज किती? Renault Kwid E-Tech 2025 अपडेटेड Kwid EV मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही लहान EV 26.8kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते, जी 65bhp ची पॉवर जनरेट करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे. जे एकदा चार्ज केल्यावर 250 किमी पर्यंत रेंज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. DC फास्ट चार्जरवर ही कार फक्त ४५ मिनिटांमध्ये 20 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. या कारची किंमत 8 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. भारतात या कारची किंमत कमी जास्त होण्याची शक्यता आहे. ही कार थेट टाटा मोटर्सच्या टियाओ ईव्हीला टक्कर देईल.