Bike Tips: हिवाळ्यात बाइक बंद पडण्याची ही 5 कारणं, 99 टक्के लोकांकडून होते चूक!
- Published by:Sachin S
Last Updated:
थंडीच्या काळात नेहमी कार असेल किंवा बाइक असेल, सुरू करण्यात अडचणी येतात. बऱ्याच वेळा तर वाहनं सुरूच होत नाही.
advertisement
advertisement
1) इंजिन ऑइल घट्ट होणे बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये थंडीमुळे इंजिनमधील इंजिन ऑईल हे खूप घट्ट होऊन जातं. घट्ट झालेलं इंजिन ऑइल हे इंजिनमध्ये सगळ्या पार्टमध्ये पोहोचत नाही. त्याामुळे इंजिनला फिरण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त जोर लावावा लागतो. याच कारणामुळे कार असेल किंवा बाईक असेल सेल्फ किंवा किक मारल्यावर लगेच सुरू होत नाही.
advertisement
2) बॅटरी कमकुवत किंवा डिस्चार्ज होणे हिवाळ्यामध्ये नेहमी कार असेल किंवा बाईक असेल बॅटरीमध्ये बिघाड होण्याचं प्रमाण हे सर्वाधिक असतं. हिवाळ्यात बॅटरीची ताकद ही कमी होते. जर तुमची सेल्फ-स्टार्ट बाइक असेल तर जास्त अडचणी येतील. हिवाळ्यात कमी तापमान झाल्यामुळे बॅटरीमध्ये रासायनिक क्रिया मंदावते, ज्यामुळे ती कमी करंट तयार होतं.
advertisement
advertisement
advertisement


