ZP निवडणूक लागायच्या आधीच गोरेंकडून बायकोची उमेदवारी जाहीर, कमळ चिन्हावर लढणार आणि...

Last Updated:

आंधळी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नी सोनल गोरे या कमळ चिन्हावरून लढतील, असे शेखर गोरे यांनी निवडणूक लागायच्या आधीच जाहीर केले.

शेखर गोरे-देवेंद्र फडणवीस
शेखर गोरे-देवेंद्र फडणवीस
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा : माण तालुक्यातील आंधळी येथील मेळाव्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधीच आपल्या पत्नीची कमळ चिन्हावरून उमेदवारी जाहीर केलीये. शेखर गोरे यांनी आंधळी गटात घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा केली.
आंधळी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नी सोनल गोरे या कमळ चिन्हावरून लढतील, असे सांगताना त्या कमळ चिन्हावर निवडून येणार आणि यापुढील काळात भाजपचा आमदार मीच होणार, असेही त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. मी आमदार झाल्यावर मंत्री जयकुमार गोरे यांचा गट वेगळा असेल आणि शेखर भाऊ गोरे यांचा गट वेगळा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement

मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन आल्यामुळे उमेदवारांनी माघार घेतली नाही तर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यामुळे म्हसवड नगरपालिकेसाठी दिलेल्या उमेदवारांची उमेदवारी माघारी घेतली. कमळाच्या चिन्हावर उमेदवार लढविण्याची मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती. मात्र कमळ चिन्हावर आमची तयारी नसल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे माघार घेतली, असे शेखर गोरे म्हणाले.

आमच्या माघाराची चर्चा पण आज बायकोच्या उमेदवारीची घोषणा करतो

advertisement
आंधळी गटामध्ये चर्चा सुरू आहे. शेखर गोरे यांच्या घरातील सदस्य जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभा राहणार आणि शेवटच्या क्षणी माघार घेणार. पण आज मी माझ्या बायकोची आंधळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर करतो, ते सुद्धा कमळ चिन्हावर, अशी घोषणा गोरे यांनी केली.

बंधू जयकुमार गोरे यांच्याशी जमलं तर ठीक नाही तर....

advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांनी शेखर भाऊ गटात प्रवेश केला आहे त्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही . भविष्यात माझी बायको जिल्हा परिषद गटात कमळ चिन्हावर निवडून येईल आणि शेखर भाऊ सुद्धा कमळ चिन्हावरच आमदार होणार. मी भविष्यात भाजपचा आमदार झालो तरी शेखर भाऊ गट वेगळा असणार आणि मंत्री जयकुमार गोरे यांचा गट वेगळा असेल. मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत जमले तर ठीक नाही तर ग्रामपंचायत आणि सोसायटीसुद्धा शेखर भाऊ गटाची असेल. जोपर्यंत जयकुमार गोरे आणि मी एकत्र बसून चर्चा करत नाही तोपर्यंत या माण तालुक्यातील उमेदवारी जाहीर होणार नाही, असे शेखर गोरे म्हणाले.
advertisement

मी ज्यांच्यासोबत असतो, त्यांना गुलाल लागतो हे लक्षात ठेवावे

शेखर गोरे ज्यांच्या सोबत राहिला त्यांच्या अंगावर गुलाल पडला. २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत होतो, त्यावेळी ते निवडून आले. २०१९ मध्ये रणजीत निंबाळकर यांच्या सोबत होतो, त्यांना सुद्धा गुलाल मिळाला. २०२४ ला खासदारकीला आपण धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत होतो, त्यांना सुद्धा गुलाल लागला. आणि आता २०२४ मध्ये जयकुमार गोरे यांच्या सोबत राहिलो, त्यांना सुद्धा गुलाल लागला. याचाच अर्थ आपण ज्यांच्यासोबत असतो तिथेच गुलाल असतो, असेही गोरे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP निवडणूक लागायच्या आधीच गोरेंकडून बायकोची उमेदवारी जाहीर, कमळ चिन्हावर लढणार आणि...
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement