दिल्ली विद्यापीठातील या विद्यार्थिनी आहेत टॉपर महिला IAS अधिकारी, यादीत लातूरच्या सूनेचाही समावेश
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भारतातील सर्वात कठीण परीक्षा यूपीएससीमध्ये मुलींनीही अनेकदा टॉप केले आहे. आज आपण अशाच काही टॉपर महिला आयएएस अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेऊयात. या महिला अधिकाऱ्यांमध्ये लातूरच्या सून यांचाही समावेश आहे. (अभिषेक तिवारी, प्रतिनिधी)
2016 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेज फॉर वूमेन येथून राज्यशास्त्रामध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यांनी यूपीएसचीची तयारी केली. यानंतर 2015 च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशात टॉप केले. त्या मध्यप्रदेशातील भोपाळ येथील रहिवासी असून त्यांचा जन्म हा 9 नोव्हेंबर 1993 मध्ये झाला होता. टीना डाबी यांनी राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आणि मूळ लातूरचे असलेले प्रदीप गावंडेसोबत दुसरे लग्न केले आहे.
advertisement
advertisement
आयएएस परी बिश्नोई या सुद्धा दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. परी बिश्नोई यांनी दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वूमेन येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1996 ला राजस्थानच्या बिकानेर येथे झाला होता. परी बिश्नोई यांनी 2019 मध्ये यूपीएससी परीक्षेच्या आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 30 वी रँक मिळवली. त्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि इंस्टाग्रामवर त्याचे 162 हजार फॉलोअर्स आहेत.
advertisement
advertisement
आयएएस रिया डाबी यांनीही दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेज येथून शिक्षण पूर्ण केले. याठिकाणी त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली. आयएएस रिया डाबी या आयएएस टीना डाबी यांच्या बहीण आहेत. आयएएस रिया डाबी यांनी 2020 मध्ये यूपीएससीचा पहिला अटेम्प्ट दिला होता. यामध्ये त्यांनी 15वी रँक प्राप्त करत टॉपर्स लिस्टमध्ये जागा मिळवली.


