IAS Story : बॉयफ्रेंडबरोबर पेपरात छापला फोटो; UPSCमध्ये झाली नापास, आता IAS बनून सांगितला किस्सा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Chandni Chandran IAS Love Story:
लव्ह स्टोरी हा नेहमीच खास असतात. काही लव्ह स्टोरी इतक्या खास असतात की त्या सुंदर फोटोंसारख्या आपल्या मनात घर करून राहतात. त्या आठवल्या की आपल्या चेहऱ्यावर नकळत एक हसू येतं आणि आपलं प्रेम आणि आनंद आणखी द्विगुणीत होतो.
advertisement
चांदनी चंद्रन ही 2017च्या बॅचची IAS ऑफिसर आहे. UPSCच्या पहिल्या परिक्षेत चांदनी नापास झाली होती. 10 मे 2016 रोजी तिचा UPSCचा रिझल्ट लागला आणि तिला कळलं ती नापास झाली आहे. तिला त्या गोष्टीचा ताण आला. ती तिचा बॉयफ्रेंड अरुण सुदर्शनबरोबर फिरायला गेली. तेव्हा पावसाचे दिवस होते. दोघेही एका छत्रीत भिजू नये म्हणून प्रयत्न करत होते.
advertisement
त्याचवेळी एका फोटोग्राफने त्यांचा एक फोटो क्लिक केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा फोटो एका वृत्तपत्रात छापून आला. दोघांच्या मित्रांच्या मार्फत तो फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचला. चांदनीचा बॉयफ्रेंड अरुणने रागानं त्या मीडिया हाऊसकडे तक्रार केली. पण त्या फोटोमुळे UPSC फोटोमध्ये नापास झालेल्या चांदणीला नवी उमेद मिळाली होती. कारण तिचा फोटो त्या वर्षीच्या UPSC टॉपर्सबरोबर छापून आला होता. तिला त्यामुळे विश्वास मिळाला की आज ना उद्या आपणही नक्कीच IAS अधिकारी होऊ.
advertisement
त्या प्रसंगानंतर चांदनीला हा विश्वास होता की काही तरी घडेल आणि आपण आपल्याला हवं आहे ते नक्कीच मिळवू. तिनं जोमानं अभ्यास केला आणि 2016च्या UPSC परिक्षेत तिला यश मिळालं. चांदनी IAS ऑफिसर झाली. पुढे चांदनीआणि अरुण यांनी लग्न केलं. लग्नानंतर अरूणनं त्या फोटोग्राफरकडून त्यांचे फोटो मागून घेतले आणि त्याचे आभारही मानले.









