सरकारी नोकरी मिळवणं अवघड वाटतंय? अश्विनीचं हे यश पाहा, विश्वासच बसणार नाही!
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालन्यातील अश्विनी मोटारकर या कुंभार कन्येने मडक्याप्रमाणेच स्वतःच्या जीवनाला देखील आकार देत तब्बल सहा शासकीय नोकऱ्या मिळवल्या आहेत.
advertisement
advertisement
अश्विनी मोटारकर ही मूळची जालना जिल्ह्यातील घेटुळी या गावची रहिवाशी आहे. अश्विनीला एकूण चार बहिणी असून घरची परिस्थिती ही अत्यंत नाजूक मात्र दहावीच्या परीक्षेत अश्विनीला 91 टक्के मार्क मिळाले आणि अश्विनीची शिक्षणातील चुणूक तिचा मावस भाऊ असलेल्या सुनील सुरकुंडे यांनी ओळखली. अश्विनीच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन त्यांनी अश्विनीला माझ्याकडे राहू द्या आम्ही हिच्या शिक्षणाचा खर्च करतो असं सांगून जालन्याला घेऊन आले.
advertisement
दहावीनंतरचे सगळे शिक्षण अश्विनीने जालन्यातच घेतले. अकरावीला कॉमर्सला अॅडमिशन घेऊन तिचा जालन्यातील प्रवास सुरू झाला. बीकॉमच्या द्वितीय वर्षाला असताना तिने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. द्वितीय वर्षाला असतानाच एमपीएससी प्रीलिम्स पास झाल्यानंतर तिचा आत्मविश्वास हा वाढला. मात्र पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे ती पुढे पात्र नाही झाली. यानंतर मात्र वेगवेगळे शासकीय फॉर्म सुनील सुरकुंडे भरत गेले आणि अश्विनी वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा देत गेली.
advertisement
आतापर्यंत अश्विनीला तब्बल सहा ठिकाणी शासकीय नोकऱ्यांच्या ऑफर आहेत. यामध्ये लोवर स्टेनोग्राफर, वैद्यकीय महाविद्यालयात लिपिक, तलाठी भरती परीक्षा, जालना जिल्हा परिषद लेखा विभागात कनिष्ठ सहायक, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे टायपिस्ट आणि जालना जिल्हा परिषदेसाठी स्टेनोग्राफर अशा सहा ठिकाणी तिला नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. सध्या ती बारामती येथे लोवर स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत असून अन्य नोकऱ्या सोडण्याचा निर्णय तिने घेतला आहे. आणखी अभ्यास करून मोठ्या पदाला जाण्याचे तिचे स्वप्न आहे.
advertisement
advertisement
या यशाने तिची आई-वडील नातेवाईक अत्यंत खुश असून आई-वडील आणि मावस भाऊ सुनील सुरकुंडे तसेच मिस्टर सचिन गोडबोले यांनी केलेल्या मदतीमुळेच तसेच पाठिंबामुळेच आपण हे शिखर सर करू शकलो, अशी भावना अश्विनी व्यक्त करते. गाव खेड्यात राहणाऱ्या मुलींनी देखील खचून न जाता शिक्षणाची कास धरावी आणि आई-वडिलांनी ही त्यांना सपोर्ट करावा अशी भावना देखील तिने बोलून दाखवली.