Beed: ...मला हाल हाल करून मारतील, त्या 3 मुंडेंबद्दल बीडच्या शिक्षकाची आणखी एक पोस्ट समोर
- Published by:sachin Salve
Last Updated:
या शिक्षकाने तब्बल १८ वर्ष शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. पण इतके वर्ष काम करूनही वेतन काही मिळालं नाही. पण आत्महत्येच्या आधी दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर काही पोस्ट केल्या होत्या.
बीड जिल्ह्यामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. कुणाला कुठे मारहाण होते, तर कुठे कुणाचा खून केला जातो. बीडमध्ये अशीच एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या शिक्षकाने तब्बल १८ वर्ष शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. पण इतके वर्ष काम करूनही वेतन काही मिळालं नाही. त्यामुळे या शिक्षकाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पण आत्महत्येच्या आधी दोन दिवसांपासून त्यांनी 'आता एकच विषय विषय खलास, विषय संपला विषयाला पूर्ण विराम. मी जगणं कधीचच सोडलेलं आहे. बघू पुढे भविष्यात काय काय होतंय ते' अशी पोस्ट फेसबुकवर केल्याचं समोर आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धनंजय अभिमान नागरगोजे जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी होते. ते मागील १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. १८ वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. 2019 मध्ये राज्य सरकारने या शाळेला 20 टक्के अनुदान घोषित केलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही.
advertisement
धनंजय अभिमान नागरगोजे आपल्या पोस्टमध्ये लेकीसाठी म्हणाले की, "श्रावणी बाळा तुझ्या बापुला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. मी कधी कुणाला दोन रूपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच, तर तुझ्या बापूला एकदा माफ कर. कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे. तुला अजून काहीच कळत नाही, तुझं वय आहेच किती... तीन वर्षे... तुला काय कळणार.... ज्यांना कळायला पाहिजे होतं, त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे.
advertisement
विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होत की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे काम करतोय. मला अजून पगार नाही. आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
तसेच विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवत आहे. आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मोठ्या मनाने माफ करा. सर्वांना माझा शेवटचा राम राम.... अशी भावनिक पोस्ट नागरगोजे यांनी लिहिली होती.
advertisement
advertisement