'आपण 8 वर्षांपूर्वी जोडलेले नातं...' आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीला वाढदिवशी खास व्यक्तीनं दिल्या शुभेच्छा
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. तिची ही भूमिका घराघरात लोकप्रिय झाली. ही अभिनेत्री आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिला आजच्या दिवशी चाहते भरभरून शुभेच्छा देत आहेत. पण तिला एका खास व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अश्विनीसाठी निलेशने लिहिलंय की, 'या आपल्या 8 वर्षांच्या प्रवासात खुप चढ-ऊतार, सुख-दुखः पाहीले, खुप लोकांचा सहवास लाभला, काहींनी जोडून ठेवले तर काहींनी तोडले पण त्यातूनही कायम राहिले ते आपण 8 वर्षांपूर्वी जोडलेले नातं. आईने सागितल्याप्रमाणे माणूस नेहमी मोठा असायला हवा व ते कायम जपायला हवे. नानांना दिलेल्या शब्दांपासून कधी मागे हटणार नाही, कायम सोबत आहे'
advertisement
advertisement
advertisement









