आकाश ठोसरच रिंकु राजगुरूचा खऱ्या आयुष्यातील 'परशा'? अभिनेत्याने अखेर मनातलं सांगितलंच, म्हणाला 'ते स्वप्न...'

Last Updated:
Akash Thosar-Rinku Rajguru : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाने तिला 'आर्ची' म्हणून रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. याच चित्रपटातून आकाश ठोसर 'परशा' म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला.
1/7
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील रिंकू राजगुरु यांना आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाने तिला 'आर्ची' म्हणून रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. याच चित्रपटातून आकाश ठोसर 'परशा' म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. या दोघांनाही 'सैराट'ने एक नवी ओळख दिली, त्यांचे चाहते प्रचंड वाढले.

advertisement
2/7
आज रिंकूचा वाढदिवस असल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे. प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमीच कुजबुज सुरू असते, खासकरून आकाशसोबतच्या तिच्या 'रिलेशनशिप'च्या चर्चांची. आकाश ठोसरने एका मुलाखतीदरम्यान आपल्या आणि रिंकूच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

3/7
आकाश ठोसरचा 'घर बंदूक बिर्याणी' हा सिनेमा ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्याच्यासोबत सायली पाटील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आकाश आणि त्याच्या टीमने 'लोकमतच्या नो फिल्टर' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

4/7
याच मुलाखतीत आकाशला रिंकूसोबतच्या अफेअरच्या चर्चांबद्दल विचारण्यात आले. "हे खरे आहे का?" या प्रश्नावर आकाशने अगदी स्पष्टपणे सांगितले, "असे काही नाही. आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. मित्र म्हणून भेटतो आणि फिरत असतो. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत." आकाश पुढे म्हणाला, "आकाश-रिंकूपेक्षा लोकांना आर्ची-परशा म्हणून आम्ही खूप आवडतो आणि त्यांचे ते स्वप्न 'सैराट'मध्ये पूर्ण झाले आहे. आमच्यात तसे काही नाही."

5/7
मुलाखतीत, "तू सध्या कोणाला डेट करतोयस का?" असा प्रश्न आकाशला विचारल्यावर त्याने मिश्किलपणे उत्तर दिले, "आकाश स्वतःलाच डेट करतोय सध्या." यावरून तो सध्या सिंगल असल्याचे आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येते.

6/7
दरम्यान, आकाश आणि रिंकू दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि ते जेव्हाही भेटतात, तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर आवर्जून शेअर करतात. चाहत्यांना 'आर्ची' आणि 'परशा' ही जोडी पुन्हा एकत्र पडद्यावर बघण्याची प्रचंड उत्सुकता आहे.

7/7
मात्र, अद्याप त्यांच्या कोणत्याही आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. 'लोकांचे प्रेम आणि याच प्रेमामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत, हे यश गाठू शकलोय', असे आकाशने एका मुलाखतीत नमूद केले होते. त्यांच्या या मैत्रीपूर्ण नात्यामुळे चाहत्यांच्या मनात 'आर्ची-परशा'चे स्थान मात्र कायम आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement