धर्माच्या नावावर GF ने केलं ब्रेकअप! तुटलं सिंगरचं हृदय, म्हणाला 'माझ्यामध्ये इस्लामचा...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बॉलिवूड सिंगरने नुकतंच त्याच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअपचे कारण सांगितले.
advertisement
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत अमाल म्हणाला, "मी माझ्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदाच बोलतोय. पण मला वाटतं, आता वेळ आली आहे." तो म्हणाला, "कबीर सिंग चित्रपटात काम करणं हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं 'हार्टब्रेक' होतं. कारण त्यावेळी मी भावनिकदृष्ट्या खूप कठीण परिस्थितीतून जात होतो. मी ज्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, ती त्यावेळी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार होती."
advertisement
advertisement
अमाल पुढे म्हणाला, "मी परफॉर्म करायला जाणार होतो, तेवढ्यात तिचा फोन आला आणि ती म्हणाली की, मी लग्न करत आहे. जर मी तिच्याकडे गेलो असतो, तर ती पळून जाण्यास तयार होती. पण मला वाटतं की माझ्यामध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधला शाहरुख जागा झाला आणि मी तिला म्हणालो की, जर तुझ्या आई-वडिलांना माझा धर्म आणि माझं करिअर मान्य नसेल, तर तुला 'ऑल द बेस्ट'."
advertisement
अमाल पुढे म्हणाला, "त्या संपूर्ण घटनेने मला आतून तोडून टाकलं होतं. लोकांच्या मनात आहे की मी मुस्लिम आहे, पण सत्य हे आहे की माझे वडील मुस्लिम आहेत, तर माझी आई सारस्वत ब्राह्मण हिंदू आहे. मला काहीही विचित्र वाटलं की मी माउंट मेरीला जायचो. आम्ही देवावर विश्वास ठेवतो, पण देवाला घाबरत नाही. माझ्या मनात कोणत्याही एका धर्माबद्दल कट्टर भावना नाहीत. माझ्या नात्यात त्यांना धर्मापेक्षा जास्त अडचण इंडस्ट्रीमुळे होती. ते जाट होते. त्यांनी मला विचारलं की, तू इस्लाम बॅकग्राउंडमधून आहेस, तेव्हा मी त्यांना म्हणालो की, माझ्यामध्ये इस्लामचा 'ई' (I) पण नाही. मी कर्मावर विश्वास ठेवतो. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो."
advertisement
अखेरीस अमाल म्हणाला की, "जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. जे लोक मला माझ्या धर्मावरून आणि कामावरून इतकं नकारात्मक समजतात, त्यांच्याशी मी जोडला गेलो नाही हेच चांगलं झालं. कदाचित आमचं नातं जास्त काळ टिकलं नसतं. आता मला तिची आठवणही येत नाही." अमालच्या या खुलाशाने त्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील एका अनपेक्षित बाजूची ओळख करून दिली आहे.