advertisement

'प्रत्येक वेळी सईसारखी बिकिनी घालण्याची गरज नाही...' पछाडलेला फेम अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

Last Updated:
Ashwini Kulkarni : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिनं नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना मराठी चित्रपटांमध्ये स्त्रियांना योग्य सादरीकरण मिळत नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे पाहूयात.
1/7
‘वरण भात लोणचं कोण नाय कोणाचं’, ‘सौभाग्यवती सरपंच’, ‘पछाडलेला’, ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अशा वेगवेगळ्या चित्रपट आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने नुकतेच मराठी इंडस्ट्रीबाबत एक थेट आणि स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तिचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

2/7
द पोस्टमन या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अश्विनी कुलकर्णी म्हणाली,"मराठी चित्रपटांमध्ये स्त्रियांना ज्या पद्धतीने सादर करता आलं पाहिजे तसं झालेलं नाही."

3/7
" 'नो एन्ट्री'मध्ये अंकुश चौधरीने सई ताम्हणकरला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलं होतं, त्यानंतर फार काही विशेष पाहायला मिळालं नाही."

4/7
"वरण भात लोणचं...मध्ये मी एक सरप्राइज एलिमेंट होते. पण तरीही उंच, हॉट, बोल्ड बायकांना जेवढं उठून दिसायला हवं होतं ते नाही झालं.”

5/7
अश्विनी पुढे म्हणते,"मराठी चित्रपटांमध्ये एकतर स्त्रीला फारच सोशिक दाखवतात किंवा मग ती बंडखोर असते. पण स्त्रीचं सौंदर्य, आत्मविश्वास आणि विविध रूपं याकडे दुर्लक्ष केलं जातं."

6/7
" ऐश्वर्या रायचं उदाहरण घ्या PS-1 आणि PS-2 मध्ये ती राणी असूनही हॉट आणि सुंदर दिसते. धूम 2 मध्ये ती बोल्ड आहे. पण दोन्ही रूपं ताकदीची आहेत. मराठी निर्मात्यांना हे समजलेलं नाही."

7/7
अश्विनी कुलकर्णीने स्पष्ट केलं की, "प्रत्येकवेळी सई ताम्हणकरसारखी बिकिनी घालणं गरजेचं नाही. एक स्त्री साडीमध्येही हॉटच दिसते. जर तिला तशी भूमिका आणि सादरीकरण मिळालं, तर. हेच बदल मराठी वेब सिरीजमध्ये थोडं थोडं दिसायला लागलं आहे, जे सकारात्मक आहे.”

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement