3 तास 19 मिनिटांची ही फिल्म, रिलीजआधी 48 तासांत केली रेकॉर्ड ब्रेक कमाई, थिएटरमध्ये कधी धडकणार?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Border 2 Advance Booking : सनी देओल (Sunny Deol) अभिनीत 'बॉर्डर 2' हा सिनेमा रिलीजआधीपासून धुमाकूळ घालत आहे. रिलीजआधीच या सिनेमाचे रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
advertisement
advertisement
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘बॉर्डर 2’ने हिंदी 2डी फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 1,02,750 पेक्षा अधिक तिकिटांची विक्री केली आहे. ब्लॉक सीट्स वगळता चित्रपटाची प्री-सेल कमाई 3.34 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर ब्लॉक सीट्सचा समावेश केल्यास हा आकडा वाढून 6.58 कोटी रुपयांवर जातो. हे सर्व आकडे 21 जानेवारी सकाळी 9 वाजेपर्यंतचे असून, ट्रेड तज्ज्ञांच्या मते पुढील 48 तासांत यात मोठी वाढ पाहायला मिळू शकते.
advertisement
advertisement
रिलीजपूर्वीच ‘बॉर्डर 2’ने अनेक मोठ्या चित्रपटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग रेकॉर्ड मोडले आहेत, ही बाब विशेष लक्षवेधी आहे. सनी देओलचा मागील सुपरहिट चित्रपट ‘जाट’, ज्याने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 2.4 कोटी रुपयांची कमाई केली होती, त्यालाही ‘बॉर्डर 2’ने मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. इ ‘धुरंधर’ आणि पॅन इंडिया अ‍ॅक्शन फिल्म ‘वॉर 2’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगपेक्षाही ‘बॉर्डर 2’ पुढे आहे. मात्र, सनी देओल यांची आतापर्यंतची सर्वात मोठी ब्लॉकबस्टर ‘गदर 2’ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 17.60 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि सध्या ‘बॉर्डर 2’ तो आकडा गाठू शकलेला नाही.
advertisement
advertisement
'बॉर्डर 2'मध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अगदी आधी प्रदर्शित होणारा हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या भावना जागृत करण्याचाच नाही, तर बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचण्याच्या तयारीत असल्याचेही दिसून येते.









