Rahul Deshpande : 'तुझा प्रत्येक दिवस...', घटस्फोटानंतर राहुल देशपांडेची एक्स पत्नी पहिल्यांदाच झाली व्यक्त
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rahul Deshpande : घटस्फोटाची बातमी शेअर केल्यानंतर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेची एक्स पत्नी पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे.
लग्नाच्या 17 वर्षांनंतर राहुल देशपांडेंच्या संसाराचे सूर बिघडले. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती.
advertisement
राहुल देशपांडे आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतरही ते पत्नीसोबतची मैत्री कायम ठेवणार असल्याचं ते त्यावेळी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले होते.
advertisement
आता राहुल देशपांडे यांच्या वाढदिवशी त्यांच्या पत्नीने खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या आयुष्यातील तू बेस्ट पर्सन आहेस. तुझा प्रत्येक दिवस आनंदात जावो, असं म्हणत राहुल देशपांडेला त्याच्या पत्नीने शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
advertisement
राहुल देशपांडे आणि नेहा यांनी लग्नाच्या 17 वर्षांनंतर परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
पंडित वसंतराव यांचे नातू आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी घोषणा करता सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
advertisement