advertisement

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर विल्यम लेग्नफोर्ड गूढ मृत्यू, मरिन ड्राईव्हच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये सापडला मृतदेह!

Last Updated:

IPL 2026 BCCI Broadcast Engineer William Legnford Dies : बीसीसीआयच्या ब्रँड कास्ट इंजिनियरचा मुंबईत गूढ मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तो आयपीएलसाठी मुंबईमध्ये आला होता.

IPL 2026 BCCI Broadcast Engineer William Legnford Dies
IPL 2026 BCCI Broadcast Engineer William Legnford Dies
BCCI Broadcast Engineer Dies : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवला गेला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 13 वर्षांचा रेकॉर्ड मोडून मॅच जिंकली. पण या मॅचनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरातील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये बीसीसीआयशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

बीसीसीआयच्या ब्रँड कास्ट इंजिनियरचा मुंबईत गूढ मृत्यू

बीसीसीआयच्या ब्रँड कास्ट इंजिनियरचा मुंबईत गूढ मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तो आयपीएलसाठी मुंबईमध्ये आला आहे. विल्यम लेग्नफोर्ड असं या ब्रँड कास्ट इंजिनियर नाव आहे. तो मुंबईच्या प्रसिद्ध ट्रायडन्टमध्ये राहत होता. 24 मार्चपासून तो इथं राहत होता. 29 मार्चला मॅच संपल्यानंतर रूम नंबर 2715 मध्ये आले होते. 30 मार्च रोजी जेव्हा रिसेप्शनिस्टने त्यांना फोन केला, तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विल्यम्स लेग्नफोर्ड मूळचे ब्रिटिश नागरिक आहेत.
advertisement

मास्टर चावीने रुम उघडली अन्...

हॉटेल कर्मचाऱ्यांना रुममध्ये गेल्यावरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मास्टरचावीने रुम उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांना तातडीने डॉक्टरांना बोलवलं असताना विल्यम लेग्नफोर्ड यांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणात मरिन ड्राईव्ह पोलीस चौकीत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
advertisement

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. वैद्यकीय अहवालानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येतीये, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर विल्यम लेग्नफोर्ड गूढ मृत्यू, मरिन ड्राईव्हच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये सापडला मृतदेह!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement