वामिका-अकायसाठी फुल्ल टाइट सेक्युरिटी! वर्षाला पाण्यासारखा पैसा खर्च करतात विराट-अनुष्का, आकडा पाहून डोकं गरगरेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Virat Kohli-Anushka Sharma Bodyguard Salary : विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या बॉडीगार्डचा पगार अनेक मोठ्या कंपन्यांच्या CEO पेक्षाही जास्त आहे!
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा हे त्यांच्या मुलांच्या गोपनीयतेबाबत आणि सुरक्षेबाबत खूपच गंभीर आहेत. त्यांनी आजवर आपली मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांचा चेहरा कॅमेऱ्यासमोर येऊ दिलेला नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या बॉडीगार्डचा पगार अनेक मोठ्या कंपन्यांच्या CEO पेक्षाही जास्त आहे!
advertisement
advertisement
advertisement
विराट आणि अनुष्का दोघेही त्यांची मुलं अकाय आणि वामिकाबाबत खूपच संवेदनशील आहेत. ते आपल्या मुलांना सोशल मीडिया आणि पापाराझींपासून दूर ठेवतात, तसेच त्यांचे फोटो घेऊ देत नाहीत. बॉडीगार्ड सोनूचे काम हे देखील असते की, विराट-अनुष्का आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे फोटो कोणीही त्यांच्या परवानगीशिवाय काढू नये. २०१७ पासून सोनू अनुष्कासोबत काम करत आहे.
advertisement
विराट, अनुष्का आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या सुरक्षेसाठी सोनू खूप जास्त मानधन घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनूला वर्षाला तब्बल १.२ कोटी रुपये पगार मिळतो! हा आकडा अनेक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या पगारापेक्षाही जास्त आहे. यावरून विराट आणि अनुष्का आपल्या मुलांच्या सुरक्षेला किती महत्त्व देतात, हे स्पष्ट होते.
advertisement
advertisement
advertisement