Sachin Tendulkar : 'शूटिंगदरम्यान मी सचिनला...', अंजलीआधी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता सचिन तेंडुलकर?

Last Updated:
Sachin Tendulkar Affair : अंजलीशी लग्न करण्यापूर्वी सचिन एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आकंठ प्रेमात होता, अशा चर्चांनी ९० च्या दशकात खळबळ उडवली होती!
1/8
मुंबई: क्रिकेट आणि बॉलिवूड... या दोन जगांचं नातं तसं जुनंच. कधी मैत्री, कधी प्रेम, तर कधी चक्क लग्नापर्यंत हे नातं पोहोचतं. पण ९० च्या दशकात एक अशी बातमी समोर आली होती, जिने क्रिकेटचा 'देव' मानला जाणारा सचिन तेंडुलकर वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीझोतात आला.

advertisement
2/8
अंजलीशी लग्न करण्यापूर्वी सचिन एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'गाढ' प्रेमात होता, अशा चर्चांनी तेव्हा खळबळ उडवली होती! ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून, सुपरस्टार महेश बाबूची मेहुणी, सौंदर्यवती शिल्पा शिरोडकर होती! दोघेही मराठी असल्याने आणि काही प्रसंगी एकत्र दिसल्याने, त्यांच्यात काहीतरी 'स्पेशल बॉन्डिंग' असल्याची कुजबुज सुरू झाली.

3/8
या अफेअरच्या अफवांवर अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली,
या अफेअरच्या अफवांवर अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, "१९९१ मध्ये माझ्या 'हम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी सचिनला पहिल्यांदा भेटले." शिल्पाने सांगितलं की, तिचा चुलत भाऊ जिथे राहायचा, त्याच परिसरात सचिनही राहत होता. ते दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे आणि याच निमित्ताने सचिन तेंडुलकरशी तिची ओळख झाली.
advertisement
4/8
ती म्हणाली,
ती म्हणाली, "मी सचिनला भेटले, तेव्हा तो त्याची होणारी पत्नी अंजलीच्या प्रेमात होता! पण त्यावेळी ही गोष्ट कुणालाच माहीत नव्हती." शिल्पाने पुढे म्हटलं, "मी अभिनेत्री होते आणि सचिन स्टार क्रिकेटर होता. त्यामुळे आम्ही एकदा भेटताच, मीडियाने लगेचच प्रेमाच्या कथा रचायला सुरुवात केली. पण त्यावेळी सचिन अंजलीसोबतच रिलेशनशिपमध्ये होता."
advertisement
5/8
शिल्पा शिरोडकर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकरची सख्खी बहीण आहे. याचा अर्थ, ती सुपरस्टार महेश बाबूची मेहुणी लागते! ९० च्या दशकात शिल्पाने बॉलिवूड गाजवलं. तिने 'ब्रह्मा' या चित्रपटातून तेलुगू प्रेक्षकांनाही भुरळ घातली होती. आपल्या करिअरच्या ऐन शिखरावर असतानाच शिल्पाने चित्रपटातून ब्रेक घेऊन आपल्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं.

6/8
या अफवांवर सचिननेही तीव्र प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं होतं,
या अफवांवर सचिननेही तीव्र प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं होतं, "तुम्ही तुमच्याबद्दल ऐकलेली सर्वात वाईट अफवा कोणती?" यावर सचिनने लगेच उत्तर दिलं होतं, "मी आणि शिल्पा शिरोडकर रिलेशनशिपमध्ये आहोत, हीच ती अफवा." त्याने पुढे असंही स्पष्ट केलं की, शिल्पाला तो वैयक्तिकरित्या ओळखतही नाही. यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
advertisement
7/8
शिल्पा शिरोडकरची खरी लव्हस्टोरीही रंजक आहे. २००० साली तिने यूकेमधील बँकर अपरेश रणजीत याच्याशी लग्न केलं. त्यांना अनौष्का नावाची एक गोंडस मुलगी आहे. शिल्पाने तर अपरेशला भेटल्यानंतर दीड दिवसातच लग्नासाठी 'हो' म्हटलं होतं!
शिल्पा शिरोडकरची खरी लव्हस्टोरीही रंजक आहे. २००० साली तिने यूकेमधील बँकर अपरेश रणजीत याच्याशी लग्न केलं. त्यांना अनौष्का नावाची एक गोंडस मुलगी आहे. शिल्पाने तर अपरेशला भेटल्यानंतर दीड दिवसातच लग्नासाठी 'हो' म्हटलं होतं! "मुंबई आणि आई-वडिलांना सोडून जायचं नव्हतं, पण त्याचा प्रामाणिकपणा मला भावला. त्यामुळे मी लग्न करून परदेशात जायचं ठरवलं," असं शिल्पाने मुलाखतीत सांगितलं होतं.
advertisement
8/8
तर, सचिन तेंडुलकरने २४ मे १९९५ रोजी अंजलीशी लग्न केलं. त्यांच्यात सहा वर्षांचं वयाचं अंतर असलं तरी, त्यांचं नातं खूप मजबूत आहे. मुंबई विमानतळावर त्यांची पहिली भेट झाली आणि 'फर्स्ट साईट'मध्येच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अंजलीला सुरुवातीला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नसतानाही, तिने सचिनसाठी खेळाबद्दल सर्व काही शिकून घेतलं. त्यांना सारा आणि अर्जुन तेंडुलकर ही दोन मुलं आहेत.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement