advertisement

मराठीतील राजबिंड्या अभिनेत्याची चटका लावणारी एक्झिट; 41 वर्षांआधी कोल्हापूर-पुणे हायवेवर नेमकं काय घडलं?

Last Updated:
मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॅक अँड व्हाइट ते रंगीत असा काळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याची एक्झिट चटका लावणारी होती. 41 वर्षांआधी कोल्हापूर-पुणे हायवेवर पहाटे नेमकं काय घडलं होतं?
1/9
्रतिभावान, रुबाबदार, राजबिंडे अभिनेते फक्त हिंदी सिनेमासृष्टीत असा समज आहे. पण 70 च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे अरुण सरनाईक यांना विसरून कसं चालेल. प्रमुख नायक आणि दमदार खलनायक अशा चतुरस्त्र भूमिका त्यांनी साकारल्या. त्यांचा नैसर्गिक अभिनय, संवाद शैली, दमदार आवाजाने त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. त्यांचे अनेक जुने चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात.

2/9
मराठी चित्रपटसृष्टीतील या राजबिंड्या अभिनेत्याने फार लवकर या जगाचा निरोप घेतला. त्यांचा मृत्यू हा संपूर्ण चित्रपटसृष्टीसह त्यांच्या कुटुंबासाठी चटका लावणारा होता. एका कार अपघातात त्यांनी जीव गमावला. त्यांच्याबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब यात उद्ध्वस्त झालं.

3/9
अरुण सरनाईक यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1935 साली कोल्हापुरात झाला. अभिनयाबरोबरच ते उत्तम गायक होते. त्यांचे वडील पंडीत शंकरराव सरनाईक. कलेचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं.

4/9
अरुण सरनाईक यांचं शिक्षण मुंबईतील रूईया कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इचलकरंजी येथून इंजिनिअरिंग पूर्ण केलं. तिथेच एका कारखान्यात ते नोकरीला लागले. मात्र नोकरी करत असताना अभिनयाची भूक त्यांना शांत बसू देत नव्हती.

5/9
1956 साली त्यांनी मो. गा रंगनेकर यांच्या 'भटाला दिली ओसरी' या नाटकातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 1961 साली 'अनंत माने' या सिनेमातून त्यांचं फिल्मी करिअर सुरू झालं. ब्लॅक अँड व्हाइट आणि रंगीत असा चित्रपटसृष्टीचा बराच मोठा कालखंड त्यांनी पाहिला.

6/9
'मुंबईचा जावई', 'प्रथम तुज पाहता', 'सिंहासन', 'शेजारी शेजारी', 'भैरू पैलवान की जय', 'चांदणे शिंपत जा', 'डोंगराची मैना', 'एक गाव बारा भानगडी', 'स माहेरची माणसं', 'केला इशारा जाता जाता', 'संथ वाहते कृष्णामाई', 'थांब लक्ष्मी कुंकू लावते' सारखे अनेक मराठी चित्रपटात अरुण सरनाईक यांनी त्यांच्या अभिनयाची जादू दाखवून दिली.

7/9
अभिनय क्षेत्रात काम करताना, करिअर पिकवर असताना अरुण सरनाईक यांना गावाची ओढ लागली होती. अभिनय क्षेत्र सोडून गावी शेती करण्याचा विचार होता. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं.

8/9
दरम्यान त्यांना 'पंढरीची वारी' या सिनेमाची ऑफर आली. 21 जून 1984 साली अरुण सरनाईक 'पंढरीची वारी' या सिनेमाचं शूटिंग संपवून पहाटे घरी निघाले होते. तेव्हा त्यांचा कारचा अपघात झाला. या अपघातात त्यांचं निधन झालं. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा देखील कारमध्ये होते. त्यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.

9/9
मात्र त्यांची एक मुलगी मिरज येथे एमबीबीएसचं शिक्षण घेण्यास गेली होती. त्यामुळे ती एकटीच या सगळ्यातून बचावली. सविता सरनाईक असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. कुटुंब गमावल्यानंतर तिने मोठ्या हिंमतीने डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थमध्ये पदवी मिळवली. ती पुण्यात बालरोग तज्ञ म्हणून काम करतेय.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement