Priya Marathe: पार्टीत भेट, मैत्री अन् प्रिया मराठे अशी पडली होती अभिनेता शंतनू मोघेच्या प्रेमात, साधी सिंपल LOVE STORY

Last Updated:
Priya Marathe: मराठी विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेचे कॅन्सरमुळे निधन झालं आहे.
1/7
मराठी विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेचे कॅन्सरमुळे निधन झालं आहे. वयाच्या फक्त 38व्या वर्षी त्यांचा पडदा मागचा प्रवास थांबला. त्यांच्या जाण्याने मराठीसह हिंदी मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

advertisement
2/7
24 एप्रिल 2012 रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची सून झाली. श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघेसोबत प्रियाचे अगदी थाटात लग्न झाले. मात्र त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे.

3/7
प्रिया मूळची ठाण्याची. शुटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे. तिच्या रुममेट शर्वरी लोहकरेच्या माध्यमातून तिची शंतनूसोबत ओळख झाली. शर्वरी आणि शंतनू ‘आई’ मालिकेत एकत्र काम करत होते.

4/7
मालिकेच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या पार्टीत पहिल्यांदा प्रियाला आणि शंतनूला जास्त वेळ एकत्र बोलायची संधी मिळाली. त्या रात्रीच्या गप्पांनी दोघांच्याही आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला.

5/7
हळूहळू फोन, मेसेजेस सुरू झाले. रोजचं बोलणं मैत्रीपलीकडे जाऊन वेगळ्या नात्याचं रूप घेऊ लागलं. शंतनूने एका दिवसात थेट प्रियाला लग्नाची मागणी घातली. प्रियाही त्याच्यावर तितकीच जिवापाड प्रेम करत होती. त्यामुळे ‘हो’ म्हणायला तिला वेळच लागला नाही.

6/7
या नात्याबद्दल घरच्यांना काही कल्पना नव्हती. मात्र एका पुरस्कार सोहळ्यात शंतनूने स्टेजवरच प्रियाचं नाव घेतलं आणि गोष्ट घरच्यांपर्यंत पोहोचली. दोन्ही कुटुंबांनीही या नात्याला होकार दिला. शेवटी 24 एप्रिल 2021 रोजी या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं.

7/7
प्रिया आणि शंतनूची ही लव्हस्टोरी साधी असली, तरी त्यात खरी गोडी आहे. ना घरच्यांचा विरोध, ना अडथळे. मात्र आता प्रियाच्या जाण्यामुळे शंतनू आणि कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement