सरकारकडून पीएम किसानचा 21 व्या हप्त्यासाठी हे कामे बंधनकारक! अन्यथा पैसे मिळणार नाही
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan 21 Installment 2025 : देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना सुरळीतपणे राबवली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते.
मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना सुरळीतपणे राबवली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
२१ व्या हप्त्याची प्रतीक्षा
ऑगस्ट २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा २० वा हप्ता यशस्वीरित्या जमा झाला आहे. आता शेतकरी २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा हप्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२५ मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. जरी सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, मागील वर्षांचा अनुभव पाहता ही वेळ साधारणत: निश्चित मानली जात आहे.
advertisement
वेळेत हप्ता मिळावा यासाठी काय करावे?
शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आणि पोर्टलवरील माहिती अपडेट करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हप्ता जमा होण्यात कोणतीही अडचण येत नाही. अनेकदा माहितीतील चुका, मोबाईल नंबर नोंद नसणे किंवा आधार-खात्याशी निगडीत तांत्रिक त्रुटींमुळे रक्कम अडकते. म्हणून शेतकऱ्यांनी वेळेत पडताळणी करून घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
मोबाईल नंबर अपडेट करणे का गरजेचे?
पीएम-किसान योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना थेट मोबाईलवर पेमेंट अलर्ट, सूचना आणि अद्यतने पाठवते. जर मोबाईल नंबर नोंदणीकृत नसेल किंवा जुना असेल, तर शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती वेळेत मिळत नाही. त्यामुळे मोबाईल नंबर अद्ययावत ठेवणे फार महत्त्वाचे आहे.
मोबाईल नंबर अपडेट करण्याची पद्धत
शेतकरी आपला मोबाईल नंबर pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर सोप्या पद्धतीने बदलू शकतात: संकेतस्थळावर “ Farmer Corner” या विभागाला भेट द्या. नंतर “स्वयं नोंदणी अपडेट करा (Update Self Registration)” हा पर्याय निवडा. आपला आधार क्रमांक व कॅप्चा कोड प्रविष्ट करून “शोध” वर क्लिक करा. स्क्रीनवर आपले नोंदणी तपशील दिसतील. येथे नवीन मोबाईल नंबर टाका. सर्व माहिती नीट तपासून “सबमिट करा” वर क्लिक करा.
advertisement
यामुळे शेतकऱ्यांना त्वरित पेमेंट स्टेटस, नवी घोषणांची माहिती व इतर आवश्यक अपडेट मिळतात.
मदतीसाठी हेल्पलाइन
जर शेतकऱ्यांना काही अडचण आली, तर ते थेट १८००-१८०-१५५१ या टोल-फ्री क्रमांकावर (सकाळी ६ ते रात्री १०) पीएम-किसान हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात. तसेच अधिकृत पोर्टलवर दिलेल्या क्यूआर कोड स्कॅन करूनही मोबाईल नंबर अपडेट पेजवर जाता येते.
advertisement
दरम्यान, पीएम-किसान योजनेचा २१ वा हप्ता ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपली माहिती, ई-केवायसी आणि मोबाईल नंबर वेळेत अपडेट केल्यास निधी थेट खात्यात जमा होण्यात अडथळे येणार नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 10:46 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
सरकारकडून पीएम किसानचा 21 व्या हप्त्यासाठी हे कामे बंधनकारक! अन्यथा पैसे मिळणार नाही