Shantanu Moghe: 4 वर्षात शंतनू मोघेवर दुःखाचा डोंगर, एकापाठोपाठ एक जवळच्या व्यक्तींनी सोडली साथ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Priya marathe husband Shantanu Moghe : मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया मराठे. 38 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं. प्रियाच्या जाण्याचा सर्वांना मोठा धक्का बसला आहे मात्र तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघेचं तर सर्वच उद्ध्वस्त झालं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रिया मूळची ठाण्याची. शुटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे. तिच्या रुममेट शर्वरी लोहकरेच्या माध्यमातून तिची शंतनूसोबत ओळख झाली. शर्वरी आणि शंतनू ‘आई’ मालिकेत एकत्र काम करत होते. मालिकेच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या पार्टीत पहिल्यांदा प्रियाला आणि शंतनूला जास्त वेळ एकत्र बोलायची संधी मिळाली. त्या रात्रीच्या गप्पांनी दोघांच्याही आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला. मात्र लग्नाच्या 13 वर्षातच प्रिया शंतनूला एकटं सोडून गेली.








