मराठवाड्याची मुलगी म्हणून हिणवलं, राजश्री देशपांडे पुणेकरांसाठी बनलेली चेष्टेचा विषय, पण ही व्यक्ती धावली मदतीला, अन्...
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rajshri Deshpande : 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2026'मध्ये राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत असलेल्या 'बाप्या' या सिनेमाची अधिकृत निवड झाली होती. राजश्रीचं पुण्याबद्दल भावनिक नातं आहे. नुकतंच तिने याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
राजश्री म्हणते म्हणते,"पण सर्वच लोक तशी नव्हती. काही चांगली माणसंही होती. या माणसांनी मला माणुसकी आणि आपुलकी दिली. यातीच एक म्हणजे समर नखाते सर. औरंगाबादहून पुण्यात आलो त्या पहिल्या दिवसापासून ते माझे मार्गदर्शक आहेत. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला, मला धैर्य दिलं आणि आशा दिली. "सगळं नीट होईल. या प्रवासात आनंद शोधत राहा. हा प्रवास मोलाचा आहे. फक्त पुढे चालत राहा".
advertisement
advertisement
advertisement
राजश्री देशपांडेचा 'बाप्या' या सिनेमाची कथा दापोली येथील एका लहान मासेमार कुटुंबाभोवती फिरणारी आहे. कुटुंबातील नातेसंबंध, समाजातील दृष्टीकोन आणि वैयक्तिक संघर्ष यांचा हळुवार वेध घेणारी ही गोष्ट आहे. भावनिक संवेदनशीलता, विनोद आणि सामाजिक भाष्य यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातो. या चित्रपटाची निर्मिती मुक्तल तेलंग आणि समीर तेवारी यांनी केली असून गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्या ‘बाप्या’ मध्ये प्रमुख भूमिका आहेत.









