Sajid Khan Accident: शूटिंग सेटवर साजिद खानचा गंभीर अपघात, पायावर मोठी शस्त्रक्रिया, फराह खानने दिली महत्त्वाची अपडेट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sajid Khan Accident: एका नवीन प्रोजेक्टच्या शूटिंग दरम्यान साजिदचा सेटवर अपघात झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
मुंबई: बॉलिवूडचा चर्चेत असलेला दिग्दर्शक आणि ‘बिग बॉस’ फेम साजिद खान सध्या एका कठीण प्रसंगातून जातोय. जवळपास १० वर्षांच्या वनवासानंतर साजिद आता कुठे स्वतःला सावरण्याचा आणि पुन्हा कामाला लागण्याचा प्रयत्न करत होता, तोच नशिबाने पुन्हा त्याच्यासमोर एक मोठं संकट उभं केलं आहे. एका नवीन प्रोजेक्टच्या शूटिंग दरम्यान साजिदचा सेटवर अपघात झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
साजिदच्या या अपघाताची बातमी समजताच चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. अखेर त्याची बहीण, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिने भावाच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. फराह म्हणाली, "साजिदच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. आता तो पूर्णपणे शुद्धीवर असून त्याची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही, तो आता रिलॅक्स आहे."
advertisement
advertisement
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साजिदने आपलं दुःख व्यक्त केलं होतं. तो म्हणाला होता, "गेल्या सहा वर्षांत मी इतक्या वाईट परिस्थितीत होतो की अनेकदा आयुष्य संपवण्याचा विचारही मनात येऊन गेला. क्लीन चिट मिळूनही कोणाकडे काम नव्हतं. मला माझं स्वतःचं घर विकावं लागलं आणि आज मी भाड्याच्या घरात राहत आहे. आता कुठे मी माझ्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण हे घडलं."
advertisement
साजिदने नुकताच आपला ५५ वा वाढदिवस साजरा केला होता. 'हाऊसफुल' आणि 'हे बेबी' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा हा दिग्दर्शक आता नव्या उमेदीने कॅमेऱ्यामागे उभा राहिला होता. मात्र, या अपघातामुळे त्याच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. आता तो पूर्णपणे बरा होऊन कधी सेटवर परततो, याकडे त्याच्या जवळच्या मित्रांचं आणि चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.









