अनोखा विवाहसोहळा, फक्त 1 रुपया आणि नारळ घेऊन अभिनेत्याने केलं लग्न, वधूने दिली ही प्रतिक्रिया..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अनेक प्रकारचे लग्न सोहळ्यांमध्ये लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्यात सेलिब्रेटीचे लग्न असेल तर त्यामध्ये प्रचंड खर्च केला जातो. मात्र, एक लग्न झाले आहे, ज्याबाबत तुम्हालाही वाचून आश्चर्य होईल. यामध्ये अभिनेत्याने फक्त 1 रुपया घेऊन लग्न केले. नेमका हा अभिनेता कोण आहे, हे लग्न कुठे झालं, हे जाणून घेऊयात. (राहुल मनोहर, प्रतिनिधी)
सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाला असे वाटत आहे की, आपले लग्न हे संस्मरणीय बनावे. काही ठिकाणी आलिशान हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये लग्न लावून दिले जात आहेत. तर काही ठिकाणी मुलीच्या कुटुंबाकडून लाखो रुपये मुलांना दिले जात आहेत. काही जण हे आपल्या नववधूला घेण्यासाठी आलिशान वाहनांमध्ये येत आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक परिवर्तनाचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
नवविवाहित वधू आशा यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचे सासरे कन्हैयालाल सैनी, जेठ जितेश सैनी, जेठानी पूजा, नणंद नंदोई आशा-नरेश सैनी आणि वन्दना-सुरेश सैनी यांनी लोकेश यांच्या लग्नात हुंडा न घेण्याचा निर्णय घेतला होता. लोकेश सैनी यांनी आपल्या लग्नात फक्त 1 रुपया आणि नारळ घेऊन लग्न केल्याने समाजात एक चांगला आदर्श घालून दिला आहे.
advertisement
याबाबत अभिनेते लोकेश म्हणाले की, समाजात या निर्णयाने बदल होईल, तेव्हा आमचा विवाह यशस्वी होईल. शिक्षण ही जीवनाची गुरुकिल्ली आहे. मी माझी जीवनसाथी आशा हिच्यासोबत आयुष्याच्या वाटेवर चालायला तयार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या एका छोट्या प्रयत्नाने समाजावर प्रभाव टाकला तर मी विवाह यशस्वी मानेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


