19व्या वर्षी पहिला चित्रपट, 25मध्ये टॉपलेस फोटोशूट, मालिकेतील 'माई' कशी बनली इंडस्ट्रीची ग्लॅमर क्वीन?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
वर्षा उसगांवकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. टॉपलेस फोटोशूटने खळबळ उडवली.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक कालातीत आणि लोकप्रिय नाव म्हणजे वर्षा उसगांवकर. आपल्या अभिनयाच्या सफरीत त्यांनी मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
गोंडस सौंदर्य, मोहक व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर वर्षा यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही त्यांच्या अभिनयाची जादू कायम आहे.
advertisement
मराठी चित्रपटसृष्टीत मुख्यतः सोज्वळ, गोड आणि आधुनिक नायिका म्हणून ओळख मिळवलेल्या वर्षा यांनी आपल्या करिअरमध्ये एक मोठा प्रयोग केला होता. त्यांनी एका इंग्रजी मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
advertisement
वर्षा या मराठी इंडस्ट्रीतील मॉडर्न अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जात होत्या, मात्र अशा बोल्ड फोटोशूटमुळे त्यांच्यावर काही प्रमाणात टीकाही झाली.
advertisement
हिंदी टेलिव्हिजनवरही वर्षा यांनी स्वतःचा ठसा उमटवला. बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत त्यांनी अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही भूमिका साकारली होती, जी आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यानंतर 'चंद्रकांता' या गाजलेल्या मालिकेत 'रुपमती' ही भूमिका त्यांनी साकारली, ज्यामुळे हिंदी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले.
advertisement
मराठीतही त्यांनी मालिकांमध्ये आपले योगदान दिले आहे. स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत त्यांनी गौरी शिर्केपाटीलच्या सासूची भूमिका केली.
advertisement
'माई'च्या भूमिकेमुळे त्या प्रेक्षकांच्या अजून जवळ गेल्या. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने ही भूमिका अधिक परिणामकारक झाली आणि त्यांचा गोड आणि कणखर स्वभाव प्रेक्षकांना भावला.
advertisement
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात वर्षा उसगांवकर यांनी दमदार एन्ट्री घेतली होती. त्यांनी टॉप ६ पर्यंत मजल मारली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले.
advertisement
त्यांच्या खेळाची स्टाइल आणि सहज वावर प्रेक्षकांना प्रचंड आवडला. त्यांच्या या प्रवासाने सिद्ध केले की, त्या केवळ चांगल्या अभिनेत्री नाहीत, तर एक दमदार व्यक्तिमत्त्व देखील आहेत.
advertisement