आता पृथ्वीवर राहणार नाहीत पुरूष, शास्त्रज्ञांचं धक्कादायक संशोधन; जगावर येणार स्त्रियांचं राज्य!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
'Proceedings of the National Academy of Sciences' च्या अहवालानुसार, भविष्यात पुरुष प्रजाती पृथ्वीवरून नामशेष होण्याचा धोका आहे. पुरुषांमध्ये लिंग निश्चित करणारे...
आपले जग पुरुष आणि स्त्रियांच्या सहअस्तित्वावर आधारित आहे. जर स्त्री-पुरुषांमधील संतुलन बिघडले, तर मानवी संस्कृती लवकरच नष्ट होईल. असाच एक धक्कादायक दावा आता शास्त्रज्ञांनी केला आहे. 'प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस' (Proceedings of the National Academy of Sciences) या अहवालात म्हटलं आहे की, भविष्यात पृथ्वीवरून पुरुष जात (male race) नाहीशी होऊ शकते!
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शास्त्रज्ञांना वाटते की, पुरुष क्रोमोसोमच्या सततच्या घसरणीमुळे मानवजातीच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो. या संशोधन पेपरमध्ये असे म्हटले आहे की, Y क्रोमोसोम नसलेल्या उंदरांच्या दोन प्रजातींनी आपले अस्तित्व वाचवले आहे. या उंदरांनी Y क्रोमोसोम नामशेष होण्यापूर्वी एक नवीन क्रोमोसोम तयार केला आहे, जो नर उंदरांच्या जन्मासाठी आवश्यक आहे. ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे.