मीठामुळे दरवर्षी 18 लाख लोकांचा मृत्यू? WHO च्या नव्या अहवालाने वाढवली चिंता
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
मीठामुळे जगभरात दरवर्षी तब्बल १८ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबतचा अहवाल प्रदर्शित केला आहे.
advertisement
advertisement
बीबीसी वर्ल्ड सर्विसने केलेल्या एका स्पेशल प्रोग्राममध्ये मीठ आपल्या शरीरासाठी किती घातक आहे हे सांगण्यात आले आहे. तथापि अनेक रिपोर्ट्समध्ये आपल्या आरोग्यासाठी मिठाची गरजही सांगण्यात आली आहे. अमेरिकेतील रटगर्स युनिव्हर्सिटीचे न्यूट्रिशनल सायन्सेसचे प्रोफेसर पॉल ब्रेस्लिन बीबीसीशी बोलताना म्हणतात, 'मीठ जीवनासाठी आवश्यक आहे.'
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरवर्षी मिठामुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल बोलायचं झालं तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार दरवर्षी जगभरात मीठामुळे सुमारे १८.९ लाख लोकांचा मृत्यू होतो. या मृत्यूंमध्ये मीठ थेट भूमिका बजावत नाही. त्याऐवजी, लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या रोगांच्या उत्पत्ती आणि प्रगतीमध्ये मीठ भूमिका बजावते.
advertisement


