लिंबाची साल कचरा नव्हे, 'खजिना' आहे! पैशांची बचत आणि घर चमकवणारे 'हे' 6 जबरदस्त उपयोग वाचा!

Last Updated:
Benefits of lemon peel : सरबत असो किंवा सॅलड, लिंबू पिळल्यावर आपण एक गोष्ट हमखास करतो - त्याची साल उचलून थेट कचरापेटीत टाकतो. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही ज्या सालींना...
1/7
 Benefits of lemon peel : सरबत असो किंवा सॅलड, लिंबू पिळल्यावर आपण एक गोष्ट हमखास करतो - त्याची साल उचलून थेट कचरापेटीत टाकतो. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही ज्या सालींना कचरा समजत आहात, तो खरं तर तुमच्या अनेक समस्यांवरचा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. लिंबाच्या रसाइतकीच त्याची सालही व्हिटॅमिन-सी, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक तेलांनी परिपूर्ण असते. चला, आज जाणून घेऊया या 'निरुपयोगी' सालींचा पैसा वाचवणारा आणि घर चमकवणारा जबरदस्त उपयोग!

advertisement
2/7
 बनवा नैसर्गिक क्लिनर : महागड्या केमिकल क्लिनरला आता सुट्टी द्या! एका काचेच्या बरणीत लिंबाच्या साली टाका आणि ती पूर्णपणे बुडेल इतके पांढरे व्हिनेगर भरा. बरणीचे झाकण लावून 10-15 दिवस तसेच ठेवा. त्यानंतर हे मिश्रण गाळून स्प्रे बाटलीत भरा. किचनचा ओटा, सिंक किंवा फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरा. डाग आणि दुर्गंधी दोन्ही गायब!

3/7
 भांड्यांना द्या नवी चमक : तांब्या-पितळेची किंवा स्टीलची भांडी काळवंडली आहेत? चिंता नको! लिंबाच्या सालीवर थोडे मीठ घ्या आणि भांड्यांवर घासा. भांडी पूर्वीसारखी चमकू लागतील आणि तुमचे पैसेही वाचतील.

4/7
 फ्रीजला ठेवा दुर्गंधीमुक्त : फ्रीजमध्ये अनेक पदार्थ ठेवल्याने एक विचित्र वास येऊ लागतो. यावर उपाय म्हणून लिंबाच्या सालीत थोडा बेकिंग सोडा टाकून ती फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवा. ही साल नैसर्गिक 'एअर फ्रेशनर'सारखे काम करून सर्व दुर्गंधी शोषून घेईल आणि फ्रीजमध्ये ताजेपणा टिकवून ठेवेल.

5/7
 त्वचेसाठी बनवा फेसपॅक : सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी लिंबाची साल एक वरदान आहे. साली उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा. ही पावडर गुलाबजल किंवा दह्यामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावा. हा नैसर्गिक फेसपॅक तुमची त्वचा ताजेतवानी करेल आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आणेल.

6/7
 चहा बनवा अधिक चविष्ट : तुम्हाला चहामध्ये लिंबाचा स्वाद आवडत असेल, तर हा उपाय नक्की करून पाहा. लिंबाच्या साली वाळवून एका डबीत भरून ठेवा. चहा बनवताना त्यात सालीचे एक-दोन तुकडे टाका. यामुळे चहाला एक अप्रतिम नैसर्गिक सुगंध आणि चव येईल, जी तुमचा मूड फ्रेश करेल.

7/7
 कपाट आणि शूज रॅक ठेवा सुगंधी : वाळलेल्या लिंबाच्या साली एका लहान कापडी पिशवीत बांधून तुमच्या कपाटात, बॅगमध्ये किंवा शूज रॅकवर ठेवा. यामुळे तेथील कुबट वास निघून जाईल आणि सर्वत्र एक मंद, ताजेतवाना सुगंध दरवळत राहील. आता पुढच्या वेळी लिंबाची साल फेकण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा, कारण हा छोटासा उपाय तुमचे पैसे वाचवून घराला स्वच्छ आणि सुंदर बनवू शकतो!

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement