Benefits of Bay Leaf : कापा किंवा जाळा, ‘हे’ पान शेवटपर्यंत देईल तुम्हाला साथ, जाणून घ्या ‘या’ आरोग्यदायी पानाविषयी

Last Updated:
1/9
भारतीय खाद्य संस्कृतीत तमालपत्र हे गरम मसाला आणि जेवणाचा एक अविभाज्य घटक जरी असला तरीही कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही किंवा तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हे तमालपत्र कॅरिबियनबेटांपासून ते मलेशियापर्यंत मेस्किकोपासून टर्कीपर्यंत आढळून येतं.

advertisement
2/9
गरम मसाल्यात दिसणारं पान म्हणजे तमालपत्र ही तमालपत्राची साधी सोपी ओळख. एका साध्या फिकट हिरव्यापानासारखं तमालपत्र दिसतं. मात्र तरीही शास्त्रीय भाषेत त्याच्या अनेत प्रजाती आहेत. असं असलं तरीही या सर्व प्रकारच्या तमालपत्रांची चव आणि गुणधर्म जवळपास सारखीच आहेत.

3/9
तमालपत्रात फायबर्स आणि ए, बी 6 आणि सी अशी विविध व्हिटॅमिन्स आढळून येतात. तमालपत्रामुळे अन्न पचायला मदत तर होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबतच डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही तमालपत्र फायद्याचं आहे.

4/9
आजच्या धावपळीच्या युगात शारीरिक आणि मानसिक तणाव ही सर्वसामान्य बाब झालीये. तमालपत्र तुमचा तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. रात्री झोपण्यापूर्वी तमालपत्राची दोन पानं जाळली तर त्यातून निघणाऱ्या सुगंधी धुरामुळे  तणाव दूर होऊन शांत झोप लागू शकते.

5/9
तमालपत्रात अँटिऑक्सिडंट्स आणि इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे तमालपत्र  जाळून त्याच्या धुराचा श्वास घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत होते.

6/9
जुन्या काळातली लोकं संसर्ग टाळण्यासाठी तमालपत्राचा वापर करायचे. असं मानलं जाते की, तमालपत्राचा धूर वातावरणातील प्रदूषित कण नष्ट करण्याचं काम करतो. दररोज संध्याकाळी घरात तमालपत्र जाळून त्याचा धूर केल्यास तुमच्या घरातली हवा स्वच्छ होऊन संसर्गाचा धोका व्हायला मदत होऊ शकते.

7/9
तमालपत्र हे सुगंधी असल्याने ते एक उत्कृष्ट नैसर्गिक रूम फ्रेशनर म्हणून काम करू शकतं.त्यामुळे तुमच्या घरात तमालपत्र जाळलं तर झुरळ, डासांचा त्रास कमी होण्यासोबतच तुमचं घरही सुगंधी व्हायला मदत होईल.

8/9
तमालपत्र जाळणं हे आरोग्यासाठी फायद्याचं जरी असलं, तरीही ज्यांना श्वसनाचे आजार किंवा दमा, अस्थमासारखा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घरात तमालपत्र जाळावं. अन्यथा ज्यावेळी घरात तमालपत्र जाळलं जाणार असेल अशावेळी त्यांनी मोकळ्या हवेत जावं.

9/9
तमालपत्रातल्या युजेनॉल नावाच्या रसायनामुळे ते नैसर्गिक दाहक-विरोधी काम करतं. त्यामुळे तुमच्या हातापायांना सूज आली असेल तर तमालपत्राच्या पानांचं तेल किंवा तमालपत्र उकळून त्याचा काढा घेतल्यास तो फायद्याचा ठरू शकतं. किंवा तुम्ही तमालपत्र जाळल्यास आणि तो धूर तुमच्या शरीरात गेल्यास तुमचा सांधेदुखीचा त्रासही कमी होऊ शकतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement