नाश्त्यात केळी खाताय? 'या' 5 पदार्थांसोबत खाणं टाळा, अन्यथा पोटाचे होतील हाल!
Last Updated:
Worst Food Combination : केळी अत्यंत पोषक आणि ऊर्जा देणारं फळ आहे. यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर्स, पोटॅशियम, आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. केळी झटपट ऊर्जा देते, पचन सुधारते, रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदयासाठी फायदेशीर असते. पण तुम्हाला माहित आहे का? काही पदार्थांसोबत केळी खाल्ल्यास पोटात गॅस व ब्लॉटिंगचा त्रास होऊ शकतो. चला पाहूया ते पदार्थ कोणते आहेत.
केळी भरपूर ऊर्जा देणारं फळ मानलं जातं. बहुतांश लोक ते हेल्दी समजून सकाळच्या नाश्त्यात समाविष्ट करतात. पण कधी तुम्ही विचार केलाय का की सकाळी केळी खाणं सर्वांसाठी फायदेशीर असतं का? अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार, काही विशिष्ट फूड कॉम्बिनेशन्स खाल्ले गेले, तर त्यामुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
advertisement
केळी आणि दूध - TOI च्या रिपोर्टनुसार, काही लोकांना सकाळी उठल्यावर किंवा जिमनंतर केळी-दूध शेक प्यायला आवडते. पण आयुर्वेदानुसार, केळी आणि दूध यांचं कॉम्बिनेशन जड आणि कफ वाढवणारे असते. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटात गॅस किंवा फुगल्यासारखं वाटू शकतं. विशेषतः जे लोक लॅक्टोज इनटॉलरन्स आहे, त्यांच्यासाठी हे आणखीनच हानिकारक ठरू शकतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement