Bisleri : बिस्लेरी मिनरल वॉटर नाही, बाटलीबंद पाण्याच्या प्रकारांमधील मुख्य फरक 99 टक्के लोकांना ठावूकच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
लांबच्या प्रवासात तर पाणी बाहेर विकत घ्यावंच लागतं. काही जण बाहेरील सार्वजनीक ठिकाणचं पाणी पितात. पण हेल्थ आणि प्युरिटीचा विचार करता लोक विकतच पाण्याची बाटली घेतात.
, उन्हाळ्यात असो किंवा एखाद्या लांबचा प्रवास, तहान भागवण्यासाठी नेहमी लोकांच्या हातात पाण्याची बाटली असते. काही लोक पाणी घरातून घेऊन येतात. पण लांबच्या प्रवासात तर पाणी बाहेर विकत घ्यावंच लागतं. काही जण बाहेरील सार्वजनीक ठिकाणचं पाणी पितात. पण हेल्थ आणि प्युरिटीचा विचार करता लोक विकतच पाण्याची बाटली घेतात.
advertisement
पाण्यासाठी आपण अगदी सहजपणे दुकानात जातो आणि "एक मिनरल वॉटर द्या" असे म्हणतो आणि 'मिनरल वॉटर' म्हणजे 'बिस्लेरी' (Bisleri) असे समीकरण आपल्या मनात पक्के बसलेलं आहे. त्यामुळे बिसलेरी मिळाली की मग आपण मिनरल पाणी पितोय असं वाटतं. काही लोक तर मजेनं किंवा सहज म्हणून जातात की मी फक्त मिनरल वॉटरच पितो. यामागे त्यांचं म्हणण बिसलेरीशी असतो. पण आज आम्ही अशी माहिती घेऊन आलो आहोत, जी वाचून तुमचा खूप आधीपासूनचा चालत आलेला गैरसमज एका झटक्यात उडेल.
advertisement
advertisement
advertisement
तुमच्या पाण्याच्या बाटलीवर काय लिहिले आहे?भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) नुसार, बाटलीबंद पाण्याचे वर्गीकरण ते शुद्ध करण्याच्या पद्धतीनुसार केले जाते. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर (Packaged Drinking Water): या पाण्याचा स्रोत कोणताही असू शकतो (उदा. नळाचे पाणी, विहीर किंवा अन्य स्रोत). हे पाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (RO), क्लोरीनेशन आणि अनेक टप्प्यांतील गाळणी प्रक्रियेतून शुद्ध केले जाते. या प्रक्रियेत पाण्यातील हानिकारक घटक आणि सूक्ष्मजीव नष्ट होतात. या पाण्यावर RO प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे पाण्यातील नैसर्गिक खनिजेही कमी होतात. त्यामुळे, FSSAI च्या नियमांनुसार नंतर यात कृत्रिमरित्या (Artificially) मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखी काही खनिजे 'ऍड' (Added Minerals) केली जातात.
advertisement
advertisement
नॅचरल मिनरल वॉटर (Natural Mineral Water) : हे पाणी थेट भूगर्भातील नैसर्गिक झऱ्यातून किंवा संरक्षित जलस्रोतातून काढले जाते. यावर किमान प्रक्रिया (उदा. फक्त गाळणे आणि निर्जंतुकीकरण) केली जाते, जेणेकरून पाण्यातील नैसर्गिक खनिजे आणि त्यांचा मूळ 'टेरॉयर' टिकून राहील. यात खनिजे कृत्रिमरित्या मिसळली जात नाहीत, तर ती नैसर्गिकरित्याच चांगल्या प्रमाणात उपस्थित असतात. हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अधिक पौष्टिक मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement








