Coffee vs Green Tea Which is best : हृदयासाठी काय चांगलं, ग्रीन टी की कॉफी तुम्हाला काय आवडतं?

Last Updated:
कॉफीमुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते आणि मेंदूचं कार्य सुधारतं. हृदयासाठी देखील कॉफी फायदेशीर आहे.
1/8
सध्या जगभरात हृदयाशी संबंधित आजारांचं प्रमाण वाढलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) मते, एकट्या भारतात सुमारे 22 कोटी लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे.

advertisement
2/8
योग्य जीवनशैली आणि योग्य आहार घेऊन हे आजार टाळता येतात. कॉफी आणि ग्रीन टीचं सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जाते. पण, ग्रीन टी आणि कॉफी यापैकी कोणतं पेय आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे? याबद्दल बहुतांशी लोक संभ्रमात असतात. अशांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 

3/8
काही काळापूर्वी, जपान कोलॅबोरेटिव्ह कोहर्ट स्टडी फॉर इव्हॅल्युएशन ऑफ कॅन्सर रिस्कचा (जेएसीसी) एक रिसर्च 'अमेरिकन हार्ट असोसिएशन'च्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.

4/8
या रिसर्चमध्ये 18 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्यावर 12 वर्षे चाललेल्या या रिसर्चमधून संशोधक हे शोधण्याचा प्रयत्न करत होते की, कॉफी आणि ग्रीन टीपैकी कोणत्या पेयाचं सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

5/8
या रिसर्चमध्ये संशोधकांना असं आढळलं की, कॉफीमध्ये अंदाजे 95 ते 200 मिलीग्रॅम कॅफिन आढळतं. ग्रीन टीमध्ये कॅफिनचं प्रमाण 35 मिलीग्रॅम असते. याचा अर्थ ग्रीन टीच्या तुलनेत कॉफीमध्ये जवळपास तिप्पट जास्त कॅफीन आढळतं. त्यामुळे ज्यांना हाय बीपीची समस्या आहे त्यांच्यासाठी कॉफीचं सेवन हानिकारक ठरू शकते.

6/8
ग्रीन टी हा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला आहे. रिसर्चनुसार, ग्रीन टीमध्ये असलेला पॉलीफेनॉल नावाचा घटक कॅफिनचे हानिकारक इफेक्ट्स काढून टाकतो. त्यामुळे ग्रीन टी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो.

7/8
हृदयासाठी फायदेशीर असण्यासोबतच ग्रीन टीचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दररोज ग्रीन टी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मेंदूच्या विकासासाठी देखील मदत होते.

8/8
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त आहे, याशिवाय त्यामुळे डायबेटिस देखील नियंत्रणात राहू शकतो. ग्रीन टीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. हा घटक अँटीएजिंग फॅक्टर ठरतो. ग्रीन टीप्रमाणे कॉफीचेही अनेक फायदे आहेत. कॉफीमुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते आणि मेंदूचं कार्य सुधारतं. हृदयासाठी देखील कॉफी फायदेशीर आहे. पण, हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी जास्त कॉफी पिऊ नये.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement