Side Effects of Eating Raw Food: ‘हे’ पदार्थ खाताना घ्या काळजी, चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास होतील दुष्परिणाम
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Eating Raw Food Side Effects in Marathi: अनेकांना भाज्या, अंडी किंवा काही गोष्टी कच्च्या खायला आवडतात. त्यांच्या मते कच्च्या फळभाज्या खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण त्या कच्च्या खाल्ल्याने त्यातली पोषक तत्वे कमी होत नाही. काही अंशी हे खरं जरी असलं तरीही हा नियम सरसकट सगळ्या पदार्थांना लावता येणार नाही. काही पदार्थ, भाज्या अशा आहेत की, त्या कच्च्या खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यात असलेले विषारी घटक, हानिकारक जीवाणू पोटाच्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. जाणून घेऊयात कोणते पदार्थ कच्चे खाणं टाळावं.
बॉडी बिल्डर्स आणि वर्कआउट करणाऱ्या व्यक्ती कच्चं अंड खाणं पसंत करतात. मात्र हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अंड्यांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असतात, जे विषबाधेसाठी कारणीभूत ठरू शकतात.त्यामुळे अंड फक्त कच्चच नाही तर अर्धवट शिजलेलं जरी असेल तरीही पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कच्च अंड खाणं किंवा हाफ फ्राय, हाफ बॉईल अशी पद्धतीने अंडी खाणं टाळावं.
advertisement
अनेकांना बटाटा फार आवडतो. वडापाव पासून ते भाजीपर्यंत अनेक गोष्टीत बटाटा असतो. मात्र हा अर्धवट शिजलेला बटाटा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. याशिवाय मोड आलेले बटाटे आपण खात नाहीत कारण ते आरोग्यासाठी धोकादायक मानले जातात. त्यामध्ये सोलॅनिन हा एक विषारी पदार्थ असतो. जो पोटात गेल्यास उलट्या,मळमळीचा त्रास होऊ शकतो. इतकंच काय तर सततच्या वापरामुळे मेंदूचे आजारही होऊ शकतात.
advertisement
मशरूम हे अनेकांना आवडतं. बटण मशरूम हे कच्चं खाता येतं. पण मशरूममध्ये विषारी पदार्थ असतात ज्यामुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. अर्धवट शिजवलेले मशरूम खाल्ल्याने शारीरिक समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे मशरूम पूर्णपणे शिजवून खाल्ल्याने विषारी रसायनं निष्प्रभ होतात आणि ती खाण्यासाठी सुरक्षित बनतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
काही लहान मुलं फ्लॉवर कच्चं खातात. आपला मुलगा शाकाहारी भाज्या आवडीने खातो म्हणून त्याचे पालकही त्यांना त्या भाज्या आवडीने खाऊ देतात. मात्र असं करणं त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचं आहे. कोबीप्रमाणेच फ्लॉवर किंवा फुलकोबीमध्येही हानिकारक कीटक असतात. त्यामुळे कच्चं किंवा अर्धवट शिजवलेलं किंवा फ्लॉवर खाणं टाळावं. फ्लॉवरही नीट शिजवून, तळून खाल्ल्यास फायदा होईल.
advertisement