Salt On Fruits : फळांवर मीठ टाकून का खाऊ नये? चविष्ट लागतात पण परिणाम वाईट
- Published by:Priya Lad
Last Updated:
Salt On Fruits Side Effects : फळांवर मीठ टाकून खाण्याची सवय अनेकांना आहे. यामुळे फळ चविष्ट लागतात. पण मिठामुळे हीच हेल्दी फळं आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
फळं आरोग्यासाठी चांगली. पण बहुतेक लोक काही फळांवर मीठ टाकून खातात. बाहेरही तुम्ही फ्रुट प्लेट घ्याल तेव्हा त्यावर मीठ किंवा चाट मसाला टाकलेला पाहाल. यामुळे फळं चविष्ट लागतात. फळांची चव वाढण्यासाठी ही सवय योग्य वाटते, पण आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र दोन्ही दृष्टीने पाहिल्यास ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही.
advertisement
आयुर्वेदानुसार प्रत्येक अन्नपदार्थाची एक विशिष्ट प्रकृती असते. फळं बहुतेक वेळा गोड, थंड आणि लवकर पचणारी असतात. त्याउलट मीठ उष्ण आणि पचनाग्नी वाढवणारं मानलं जातं. हे दोन विरुद्ध गुणधर्मांचे पदार्थ एकत्र म्हणजे हा विरुद्ध आहार ठरतो. विरुद्ध आहारामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि शरीरात आम म्हणजे विषारी घटक तयार होण्याची शक्यता वाढते.
advertisement
फळं स्वतंत्रपणे खाल्ल्यास ती पटकन पचतात. मात्र त्यावर मीठ टाकल्यास पचनाची नैसर्गिक गती बिघडते. परिणामी गॅस, आम्लता, पोट फुगणं. अपचन अशा तक्रारी वारंवार उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमी आहे त्यांच्यासाठी ही सवय अधिक त्रासदायक ठरते. आयुर्वेदानुसार विरुद्ध आहारामुळे त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. काही लोकांमध्ये खाज, पुरळ, अॅलर्जी अशा समस्या दिसून येतात. फळं आणि मीठ एकत्र घेतल्याने पित्त वाढण्याची शक्यता असते.
advertisement
advertisement






