Summer Health Tips: उन्हाळ्यात आजारी नाही पडायचं? मग रोज प्या ‘हे’ पाणी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health Benefits of lemon Water in summer: बदलत्या वातावरणामुळे मार्च महिन्यातच वैशाख वणव्याच्या झळा बसून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. मार्च महिन्यातच अशी स्थिती असेल तर एप्रिल – मे मध्ये काय होईल या विचारानेच अंगाची लाही लाही होऊ लागलीये. उन्हाच्या तडाख्यात थोडं जरी काम केलं तरी अधिक थकवा येऊ लागतो. मात्र तुम्हाला काम न करता थकवा येत असेल तर ही तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. जर खाली दिलेली लक्षणं किंवा त्रास तुम्हालाही होत असेल तर समजून जा की, तुम्हाला जर रोज एक लिंबू खाणं किंवा लिंबू सरबत पिणं गरजेचं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
<strong>नैराश्य दूर होतं :</strong> जर तुम्ही तणावात किंवा नैराश्येत असाल किंवा तुमचा मूड सतत बदलत असेल किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्हाला लिंबू पाणी पिण्याची नितांत गरज आहे. लिंबू पाण्यात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे तणाव निर्माण करणाऱ्या कॉर्टिसॉल संप्रेरकाचं उत्पादक कमी होऊन तणाव निवळायला मदत होते.
advertisement
advertisement


