Avoid Fruits at Night: रात्री ‘ही’ फळं खात आहात? आत्ताच सावध व्हा, फायद्याऐवजी होईल नुकसान
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Avoid these Fruits at Night: फळं ही आरोग्यासाठी फायद्याची असतात. एकीकडे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आजारी पडण्याचा धोका असतो, अशा वेळी व्हिटॅमिन सी युक्त फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का ही फळं योग्य वेळी खायला हवीत. जर तुम्ही चुकीच्या वेळी फळं खाल्लीत तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. जाणून घेऊयात रात्री कोणती फळं खाणं धोक्याचं ठरू शकतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कलिंगड हे थंड प्रवृत्तीचं फळ मालं जातं. त्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेचा बचाव करण्यापासून कलिंगड खाणं फायद्याचं ठरतं. मात्र हे थंडीच्या दिवसात किंवा रात्रीच्यावेळी कलिंगड खाण्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. रात्री कलिंगड खाल्ल्यामुळे गॅसेस आणि अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केव्हाही रात्री कलिंगड खाणं टाळा.
advertisement
अनेकांना आंबा आवडतो. मात्र त्यात असलेल्या अतिरिक्त साखरेमुळे रात्री पचनक्रिया मंदावते. त्यामुळे गॅसेस, अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास होण्याची भीती असते ज्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रात्री आंबा खाणं टाळावं. याशिवाय ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी पूर्ण आंबा खाण्याऐवजी आंब्याच्या फोडी खाल्ल्यास डायबिटीस नियंत्रित राहू शकेल.