कुंथलगिरीचा खवा आता सातासमुद्रपार जाणार, कशी मिळाली नवी ओळख?

Last Updated:
कुंथलगिरी परिसरात रोज तब्बल 30 टन खव्याची निर्मिती होतेय.
1/7
  कुंथलगिरीच्या खव्याला केंद्र सरकारकडून (जीआय) म्हणजेच भौगोलीक मानांकन देण्यात आलय. 1972 ला या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यावसाय म्हणून दुधापासून खवा आणि खव्याचा पेढा बनवण्यास सुरूवात केली. सोलापूर धुळे महामार्गावरती कुंथलगिरी फाट्यावर सुरूवातीला दोन ते तीन ठिकाणी चालणारा हा खवा व पेढा विक्रीचा व्यावसाय आज देश पातळीवर जावून पोहचलाय.
धाराशिव जिल्हयातील कुंथलगिरीच्या खव्याला केंद्र सरकारकडून (जीआय) म्हणजेच भौगोलीक मानांकन देण्यात आलय. 1972 ला या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यावसाय म्हणून दुधापासून खवा आणि खव्याचा पेढा बनवण्यास सुरूवात केली. सोलापूर धुळे महामार्गावरती कुंथलगिरी फाट्यावर सुरूवातीला दोन ते तीन ठिकाणी चालणारा हा खवा व पेढा विक्रीचा व्यावसाय आज देश पातळीवर जावून पोहचलाय.
advertisement
2/7
कुंथलगिरी परीसरातील काही शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला. दुधाचा खवा आणि पेढा बनवून तो विकण्यास सुरुवात केली. पुढे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी हाच मार्ग निवडला. आता खवा आणि पेढा बनवणे हाच या परिसरातील मुख्य व्यवसाय बनलाय.

3/7
येथील खव्याची पौष्टिकता आणि दर्जा पाहून केंद्र सरकारने याला जीआय मानंकन दिलंय. मुळातच या भागात शेतीला पाणी कमी असल्याने आणि हा परिसर डोंगराळ असल्यामुळे दिवसेंदिवस हा व्यावसाय करणारांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कुंथलगिरीच्या खव्याची निर्यात देशभरातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी होवू लागलीय.

4/7
या परिसरात 25 हजार शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. तर 300 खव्याच्या आणि 200 पेढयाच्या भट्ट्या या ठिकाणी चालतात. त्यातून दिवसाकाठी 30 टन खव्याची निर्मीती होते. त्यापैकी 10 टन खवा पेढा बनवण्यासाठी वापरला जातो.

5/7
बनवलेला पेढा महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी विक्री केला जातो. त्या माध्यमातून कुंथलगिरी परिसरातील 5 हजार युवकांना कायम स्वरूपी रोजगार मिळतो. तसेच या व्यावसायातून दिवसाकाठी कोट्यावधी रुपयांची उलाढाल हाते, असे खवा व्यावसायिक विनोद जोगदंड सांगतात.

6/7
एकंदरीत कुंथलगिरी देशभरात खवा आणि पेढ्यासाठी प्रसिद्ध आहे. देश पातळीवर पोहचलेला खव्याचा दर्जा, दुधाची गुणवत्ता त्याचबरोबर या परिसरातील चारा आणि पाण्यामध्ये असलेले महत्वाचे घटक पाहून केंद्र सरकारकडून याला जीआय मानांकन देण्यात आलंय, असे मत खवा व्यावसायिक जोगदंड यांनी व्यक्त केलं.

7/7
केंद्र सरकारच्या स्वामित्व विभागाने या खव्याला जीआय मानांकन दिलेय. त्यामुळे कुंथलगिरीचा खवा आता सातासमुद्रापार जाणार आहे. खव्याची विक्री आणि उत्पादनही वाढेल आणि याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकरी, खवा व्यवसायिक आणि खवा विक्रेते यांना होणार आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement