advertisement

Pune Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! अचानक ब्रेक फेल झाला अन् भरधाव कंटेनर पलटी, सध्या वाहतुकीची स्थिती काय?

Last Updated:

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे एका मालवाहू कंटेनरच्या अपघाताची एक घटना समोर आली आहे. अमृतांजन पॉईंटजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो थेट रस्त्यावर पलटी झाला.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
(अनीस शेख, प्रतिनिधी) खंडाळा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे एका मालवाहू कंटेनरच्या अपघाताची एक घटना समोर आली आहे. अमृतांजन पॉईंटजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो थेट रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात कंटेनरमधील दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील एकाला उपचारासाठी तातडीने खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कसा घडला अपघात?
पहाटेच्या वेळी हा कंटेनर (क्रमांक AP/16/TF/3379) मुंबईच्या दिशेने जात होता. याचवेळी अमृतांजन पॉईंटच्या अवघड वळणावर कंटेनरचा 'ब्रेक फेल' झाला आणि चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. सुदैवाने, या भीषण अपघातात जीवितहानी टळली असली तरी कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
अपघातामुळे मुंबईकडे जाणारी तिन्ही लेनची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवली.
कंटेनरचा अपघात इतका भीषण होता की त्याचे चेसिस तुटले होते. IRB च्या दोन हायड्रा आणि एका क्रेनच्या साहाय्याने बराच वेळ अथक परिश्रमानंतर पलटी झालेला कंटेनर उभा करून बाजूला हलवण्यात आला. सध्या एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली असून प्रशासनाने चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
पुण्यात विचित्र अपघात
पुण्यातून अपघाताची आणखी एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बाणेर परिसरात एका स्कूल बस चालकाच्या बेदरकारपणामुळे निष्पाप डिलिव्हरी बॉयचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या एका विचित्र अपघातात ट्रॅक्टरची ट्रॉली उडून दुचाकीवर पडल्याने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. शिवाजी उत्तमराव शिंदे (वय ५३, रा. बाणेर) हे ११ मार्च रोजी दुपारी आपल्या दुचाकीवरून डिलिव्हरी देण्यासाठी जात होते. बाणेरमधील ननावरे पूल ते राधा चौक दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर 'ध्रुव इंटरनॅशनल' स्कूलची बस भरधाव वेगाने येत होती. बस चालक विकास गोंगेने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ट्रॅक्टरची ट्रॉली वेगाने फिरली आणि चक्क उंच उडून मागे असलेल्या शिवाजी शिंदे यांच्या दुचाकीवर कोसळली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे शिवाजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! अचानक ब्रेक फेल झाला अन् भरधाव कंटेनर पलटी, सध्या वाहतुकीची स्थिती काय?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement