Pune Accident : ना चूक होती ना काही कल्पना; बस अन् ट्रॉलीची धडक, मध्येच दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा गेला जीव, पुण्यात विचित्र अपघात
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या एका विचित्र अपघातात ट्रॅक्टरची ट्रॉली उडून दुचाकीवर पडल्याने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला.
पुणे : पुण्यातून अपघाताची एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बाणेर परिसरात एका स्कूल बस चालकाच्या बेदरकारपणामुळे निष्पाप डिलिव्हरी बॉयचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या एका विचित्र अपघातात ट्रॅक्टरची ट्रॉली उडून दुचाकीवर पडल्याने डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला.
कसा झाला अपघात?
शिवाजी उत्तमराव शिंदे (वय ५३, रा. बाणेर) हे ११ मार्च रोजी दुपारी आपल्या दुचाकीवरून डिलिव्हरी देण्यासाठी जात होते. बाणेरमधील ननावरे पूल ते राधा चौक दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर 'ध्रुव इंटरनॅशनल' स्कूलची बस भरधाव वेगाने येत होती. बस चालक विकास गोंगेने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरात धडक दिली.
advertisement
धडक इतकी भीषण होती की, ट्रॅक्टरची ट्रॉली वेगाने फिरली आणि चक्क उंच उडून मागे असलेल्या शिवाजी शिंदे यांच्या दुचाकीवर कोसळली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे शिवाजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या वेळी हा अपघात झाला, त्यावेळी बसमधील मुलं घरी सोडून बस रिकामी परतत होती. या घटनेत बस चालकही जखमी झाला आहे.
advertisement
पुण्यातील वाढत्या वाहनांच्या संख्येसोबतच चालकांचे वेगावरील नियंत्रण सुटत चालले आहे. एकाच्या चुकीमुळे दुसऱ्याचा नाहक बळी गेल्याने बाणेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाणेर पोलिसांनी बस चालक विकास गोंगे याच्यावर गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 8:56 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : ना चूक होती ना काही कल्पना; बस अन् ट्रॉलीची धडक, मध्येच दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयचा गेला जीव, पुण्यात विचित्र अपघात







