advertisement

Pakistan Air Strike On Afganisthan: पाकिस्तानचा काबूलसह अफगाण शहरांवर एअरस्ट्राइक, महिला-मुलांसह निष्पापांचा बळी, तालिबान संतप्त!

Last Updated:

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल आणि कंधारसह अनेक शहरांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. या एअरस्ट्राइकमुळे महिला आणि मुलांसह अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून तालिबानने पाकिस्तानला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे

पाकिस्तानचा काबूलसह अफगाण शहरांवर एअरस्ट्राइक, महिला-मुलांसह निष्पापांचा बळी, तालिबान संतप्त!
पाकिस्तानचा काबूलसह अफगाण शहरांवर एअरस्ट्राइक, महिला-मुलांसह निष्पापांचा बळी, तालिबान संतप्त!
काबूल: रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या विविध प्रांतांमध्ये भीषण एअरस्ट्राइक केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याने तालिबानने संताप व्यक्त केला असून पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

नागरी वस्त्यांवर हल्ला, जीवितहानीचा आकडा वाढण्याची भीती

तालिबान सरकारचे प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी काबूल, कंधार, पक्तिया आणि पक्तिका यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना आणि सीमावर्ती भागांना लक्ष्य केले. 'टोलो न्यूज'च्या वृत्तानुसार, या हल्ल्यात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement

पाकिस्तानच्या हल्ल्यावर तालिबान संतप्त...

ईदच्या तोंडावर आणि रमजानच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या या हल्ल्यामुळे तालिबान प्रशासन प्रचंड संतापले आहे. "हा हल्ला केवळ अन्यायकारक नसून मानवी आणि नैतिक मूल्यांची पायमल्ली करणारा आहे," अशा शब्दांत मुजाहिद यांनी पाकिस्तानवर ताशेरे ओढले. अफगाणिस्तान या हल्ल्याकडे दुर्लक्ष करणार नाही आणि योग्य वेळी या कृत्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा तालिबानने दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Pakistan Air Strike On Afganisthan: पाकिस्तानचा काबूलसह अफगाण शहरांवर एअरस्ट्राइक, महिला-मुलांसह निष्पापांचा बळी, तालिबान संतप्त!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement