मराठी मुलगी कशी झाली मोमोज गर्ल? स्वरांगी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
भायखळ्याची मोमोजवाली स्वरांगी कासारे रोज घरातून निघताना शिवरायांची मूर्ती घेऊन निघते.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांच्याच प्रेरणेतून मुंबईतील भायखळ्याची एक मराठमोळी तरुणी यशस्वी उद्योजक बनलीय. भायखळ्याची मोमोजवाली म्हणून ती अनेकांसाठी प्रेरणा बनतेय.
advertisement
advertisement
advertisement
छत्रपती शिवरायांना स्वरांगी खूप मानते. त्यामुळे रोज घरातून निघताना ती महाराजांची मूर्ती सोबत घेऊन निघते. "महाराजांमुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून मी महाराजांची मूर्ती नेहमी स्टॉलवर ठेवते," असं स्वरांगीनं म्हटलंय. संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत ती विविध पदार्थांचा स्टॉल लावते. या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी असते.
advertisement
advertisement
advertisement