तुम्हीही म्हणाल शहाणा का खुळा, MBA करून विकतोय बर्गर? पण आधी कमाईचा आकडा बघा!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
खवय्यांना आवडणारी चव आणि नव्या रंगात सुरू झालेल्या या स्टार्टअपमध्ये नाशिकचाही महत्त्वाचा वाटा आहे. अशीच एक गोष्ट नाशिकच्या एमबीएचे शिक्षण पूर्ण करून एमबीए बर्गर सुरू करणाऱ्या मंदार कर्णिक या तरुणाची आहे.
पदवीयुक्त शिक्षणानंतर फूड इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने देशात अनेक ठिकाणी अभ्यासक्रमांच्या नावाने फूड जॉइंट्स नावारूपाला आले आहेत. खवय्यांना आवडणारी चव आणि नव्या रंगात सुरू झालेल्या या स्टार्टअपमध्ये नाशिकचाही महत्त्वाचा वाटा आहे. अशीच एक गोष्ट नाशिकच्या एमबीएचे शिक्षण पूर्ण करून एमबीए बर्गर सुरू करणाऱ्या मंदार कर्णिक या तरुणाची आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मंदार याने आपल्या जवळील मित्रांसोबत नाशिकमध्ये कॅफे सुरू केला. परिस्थिती बिकट असल्याने त्याने हा सर्व खर्च बँकेचे लोन घेऊन पूर्ण केला. कालांतराने मित्राने देखील हा बिझनेस सोडण्याचे त्याला सांगितले. त्या वेळेस कॅफेमधून बाहेर पडल्यानंतर हातात पैसे नसल्याने बँकेवाले घरी पैसे मागण्यासाठी येत असल्याचे मंदार सांगतो. बँकेचे पैसे भरण्यासाठी मंदार याने पुन्हा एका छोट्या कंपनीत नोकरी केली. परंतु नोकरीत मन लागतच नसल्याने त्याने स्वतःचा छोटा का होईना पण व्यवसाय करावा हेच ठरविले आणि 2023 मध्ये एमबीए बर्गरची स्थापना केली. आज मंदार या माध्यमातून महिन्याला 1 ते दीड लाखांचे उत्पन्न घेत असतो.
advertisement
advertisement