द्राक्षं की मनुके? एकाच फळाचे दोन प्रकार, पण कोणामुळे मिळतात जास्त फायदे?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
द्राक्षे आणि मनुके हे दोन्हीही पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तसेच ते दोन्हीही आरोग्यासाठी गुणकारी असल्याचे सांगितले जाते. अशातच हा प्रश्न पडतो की द्राक्षे आणि मनुके यातील आरोग्यासाठी जास्त फायदेशीर पदार्थ कोणता?
advertisement
advertisement
advertisement
द्राक्ष्यांमध्ये मनुक्यांच्या तुलनेत कमी कॅलरी आढळतात. द्राक्षे सुकवून मनुके तयार केले जातात. या प्रक्रियेत साखर आणि अँटीऑक्सिडंट्सचा वापर केला जातो. यामुळे मनुक्यांमधील कॅलरी वाढते. जर तुम्ही अर्धा कप द्राक्षं खाल्ली तर केवळ ३० कॅलरी मिळतील. याउलट जर तुम्ही तितक्याच मनुक्यांचे सेवन केल्यास २५० कॅलरी मिळतील.
advertisement
advertisement
advertisement
द्राक्षे आणि मनुके हे दोन्हीही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरू शकते. मात्र या दोघांमध्ये द्राक्षांचे सेवन जास्त फायदेशीर आहे. कारण यात कमी कॅलरी असतात. ज्या पदार्थांमध्ये कमी कॅलरी असतात ते आरोग्यासाठी गुणकारी मानले गेले जाते. तसेच कोणतेही फळ त्याच्या मुळ स्वरूपातच खाणे चांगले.