Healthy Food: बदाम की अक्रोड, मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी कोणतं ड्रायफ्रूट चांगलं? आहारतज्ज्ञांचा सल्ला
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Healthy Food: ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जातात. अनेकजण मेंदूच्या चांगल्या वाढीसाठी बदाम आणि अक्रोड खाण्याला प्राधान्य देतात.
ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जातात. शरीरासाठी आवश्यक पोषक घटक त्यातून मिळत असतात. विशेष करून बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने मेंदूसाठी जास्त फायदा होतो, असं सांगितलं जातं. पण अक्रोड खाणं जास्त लाभदायी की बदाम याबाबत अनेकांना संभ्रम असतो. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती दिलीये.
advertisement
मेंदूच्या वाढीसाठी आपण बदाम आणि अक्रोड खात असतो. पण हे दोन्ही खाणं देखील आपल्या शरीरासाठी विशेष करून मेंदूसाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही बदाम खात असाल तर ते बदाम तुम्ही भिजून खायला हवेत. त्यासोबत तुम्ही अक्रोड देखील भिजवून खाल्ले तर त्यातून जास्त फायदे हे मिळतात. साधारण चार ते पाच बदाम आणि एक मूठभर अक्रोड दररोज खाल्ले तर ते जास्त लाभदायी ठरते, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
advertisement
advertisement