नितळ आणि चमकदार त्वचा हवीय? मग मसूर डाळीचा करा असाही वापर; होईल फायदा
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
आहारासोबतच मसूर डाळीचा वापर तुम्ही सुंदर दिसण्यासाठी सुद्धा करू शकता.
प्रत्येकाच्या घरी मसूर डाळीचा उपयोग आहारात होत असतो. ही डाळ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण आहारासोबतच मसूर डाळीचा वापर तुम्ही सुंदर दिसण्यासाठी सुद्धा करू शकता. त्वचा नितळ आणि चमकदार करण्यासाठी मसूर डाळ वापरता येऊ शकते. याबाबतच वर्धा येथील ब्युटीशीयन सोनाली पाणबुडे यांनी माहिती दिलीय.
advertisement
advertisement
रात्री थोड्या दुधात मसूर डाळ, चंदन पावडर, संत्र्याचे साल, भिजत टाकून सकाळी मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनने लावायची आहे. 15-20 मिनिटांनी धुवून घ्या. या पॅकमुळे कोरडी त्वचा मॉश्चराईज होऊन उजळण्यास मदत होईल. मसुरच्या डाळीच्या पेस्टमध्ये मध ऍड करून चेहऱ्यावर पॅक मास्क लावा. हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून अराम मिळेल. त्वचा ग्लो करेल.
advertisement
advertisement
त्वचेशी संबंधित समस्या पिंपल्स, डाग आणि कोरडी त्वचा यापासून मसूरच्या डाळीने आराम मिळवता येऊ शकतो. मसूर डाळीने तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो. धुळ, माती, मेकअप, वातावरणातील बदल आणि प्रदूषणाचा परिणाम झाल्यामुळे जर तुमची त्वचा काळवंडली असेल तर त्वचा उजळण्यासाठी मसूर डाळ तुम्ही नक्कीच वापरू शकता, असंही ब्युटिशियन सोनाली पाणबुडे सांगतात.