पावसाळ्यात या 5 भाज्या टाळा! अन्यथा तब्येत बिघडलीच म्हणून समजा
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
पावसाळा सुरू झाला की अनेक आजारही डोकं वर काढतात. आपल्या खाण्यातून बऱ्याचदा इन्फेक्शन होण्याचा धोका या काळात अधिक असतो. त्यामुळे तळलेले पदार्थ आणि स्ट्रीट फूड शक्यतो टाळलंच पाहिजे, असं राजस्थानातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर श्री राम सांगतात. तसेच रोजच्या आहारातून 5 भाज्या शक्यतो टाळण्याचा सल्लाही ते देतात.
advertisement
प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात वांग्याची भाजी केलीच जाते. परंतु, पावसाळ्यात वांगी किडण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या काळात जास्त वांगी खाणं टाळलं पाहिजे. काही लोकांना तर वांग्यातील एल्कलॉइडमुळं एलर्जी होण्याचा धोकाही असतो. त्यामुळं अंगावर पित्त उठणं, खाज सुटणं, मळमळणं आणि त्वचेवर पुरळ उठणं यासारख्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
advertisement
advertisement
advertisement
स्टार्टर, नूडल्स आणि बहुतांश चायनिज पदार्थांत शिमला मिरची वापरली जाते. पावसाळ्यात मात्र ही फळभाजी फारशी उपयुक्त नाही. तिचं कच्चेपण आणि थंड प्रकृती पचनसंस्थेला त्रासदायक ठरू शकतो. पित्त होऊन वात आणि पित्त दोष वाढू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी शक्यतो या 5 भाज्या टाळाव्यात, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देतात.